Home /News /national /

कोरोना व्हायरसची दहशत पसरवल्याप्रकरणी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात कोर्टात तक्रार

कोरोना व्हायरसची दहशत पसरवल्याप्रकरणी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात कोर्टात तक्रार

चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांनाही या यादीत स्थान मिळालं आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांनाही या यादीत स्थान मिळालं आहे.

चीनच्या वुहानपासून कोरोना या महाभयंकर विषाणू पसरण्यास सुरुवात झाली. आज संपूर्ण जगभरात कोरोनाचा विळखा वाढत आहे

    नवी दिल्ली, 16 मार्च : कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) विळखा जगभर पसरत आहे. चीनमधील (China) वुहानपासून (Wuhan) पसरत चाललेला हा व्हायरस अनेक देशांपर्यंत पोहोचला आहे. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. यामध्ये भारतात आतापर्यंत 2 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे कोरोनाबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणात कोरोना व्हायरससंदर्भात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) आणि राजदूत सन बे बेन यांच्या विरोधात मुझफ्फरपूर कोर्टात तक्रारी दाखल करण्यात आली आहे. अधिवक्ता सुधीर ओझा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 11 एप्रिल रोजी होणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार करुन संपूर्ण जगाला घाबरुन आणि दहशत पसरवल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. आयपीसीच्या 269, 270,109,120 बी अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित - कोरोनाचे संशयित रुग्ण मारत होते लोकांसोबत गप्पा, सरकारने घेतला आता मोठा निर्णय यावर तक्रारदार सुधीर ओझा म्हणाले की, जाणीवपूर्वक कट रचून चीनने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे, त्याबद्दल आज मुजफ्फरपूरच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे, याची पुढील सुनावणी 11 एप्रिल 2020 रोजी होणार आहे. आतापर्यंत दिल्लीत कोरोना बाधित रुग्णांची  7 प्रकरणं समोर आली आहेत. त्याच वेळी उत्तर प्रदेशात 12, कर्नाटकात 6, महाराष्ट्रात 39, लडाखमधील 3 आणि जम्मू-काश्मीरमधील 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय तेलंगणात 3 आणि राजस्थानमध्ये 2 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्याचं प्रत्येकी एक प्रकरण तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये नोंदवले गेले आहे. यासंदर्भात मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संक्रमित 110 पैकी 17 लोक परदेशी आहेत. त्यापैकी 16 इटालियन आहेत. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केरळमधील 3 रुग्णांसह 13 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आले आहे. संबंधित -  मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही कोरोनाचा नवा रुग्ण, राज्यातील रुग्णांची संख्या 39 वर
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: China, Corona virus in india, Xi Jinping

    पुढील बातम्या