अफझल गुरूच्या मुलाची मोदी सरकारकडे 'ही' मागणी

अफझल गुरूच्या मुलाची मोदी सरकारकडे 'ही' मागणी

  • Share this:

नवी दिल्ली,5 मार्च : संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अफझल गुरूचा मुलगा गालिब गुरूने डॉक्टर बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गालिब गुरू सध्या नीट परीक्षेची तयारी करत आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्याचे परदेशात जाण्याचे स्वप्न आहे. यासाठी भारताचा पासपोर्ट मिळवा, अशी विनंती त्यानं मोदी सरकारकडे केली आहे. गालिब गुरूनं म्हटलंय की, 'आधार कार्ड मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. पण भारताचा पासपोर्टदेखील मिळावा'.

तुर्कस्तानातील मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेण्याची इच्छा गालिबने व्यक्त केली आहे.  18 वर्षांचा गालिब गुरू आपले आजोबा गुलाम मोहम्मद आणि आई तब्बस्सुमसोबत राहत आहे. गालिबने दहावीमध्ये 95 टक्के तर बारावीत 89 टक्के गुण मिळवले होते. 'अफझल डॉक्टर होऊ शकला नाही पण गालिब नक्कीच डॉक्टर होईल' असा विश्वास त्याच्या आजोबांनी व्यक्त केला आहे.

संसदेवर 2001 मध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफझल गुरू 9 फेब्रुवारी 2013रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे नऊ जवान शहीद झाले होते.

First published: March 5, 2019, 2:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading