Home /News /national /

भाजपला झटका! पश्चिम बंगालनंतर 'या' राज्यातही भाजपमध्ये खिंडार?

भाजपला झटका! पश्चिम बंगालनंतर 'या' राज्यातही भाजपमध्ये खिंडार?

पश्चिम बंगालमध्ये भाजप (BJP)मध्ये मोठं खिंडार पडणार असल्याचं दिसतंय. भाजपचे जवळपास 25-30 आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय भाजपचे 2 खासदारही तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छूक आहेत.

    आसाम, 17 जून: भाजपमधून तृणमूल (Trinamool Congress) काँग्रेसमध्ये परतल्यानंतर मुकुल रॉय (mukul roy) आता भाजपमधील आमदारांसोबत संपर्कात असल्याचं समजतंय. भाजपचे जवळपास 25-30 आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय भाजपचे 2 खासदारही तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप (BJP)मध्ये मोठं खिंडार पडणार असल्याचं दिसतंय. दरम्यान पश्चिम (west bengal) बंगालनंतर त्रिपुरा (Tripura)मध्येही तृणमूल काँग्रेसनं भाजप बंडखोरांना पक्षात समाविष्ठ करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. मुकुल रॉय (Mukul Roy)यांच्या टीएमसी (TMC) मध्ये घरवापसी झाल्यानंतर राजकारणात बऱ्याच हालचाली सुरु झाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये आताच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये फूट पडल्याचं चित्र दिसून येतंय. सोमवारी बंगालमधले भाजप नेते सुवेंद्रु अधिकारी राज्यपाल जगदीप धनखड यांना भेटण्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत 77 आमदारांपैकी 51 आमदारच उपस्थित होते. त्यामुळे येत्या काळात भाजपला बंडखोरीला सामोरं जावं लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान भाजपमधील अनेक लोकांसोबत माझं बोलणं सुरु असल्याचं मुकुल रॉय यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि मंत्र्यांसह अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यातील अनेक नेत्यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती समोर येतेय. हेही वाचा- एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा अटकेप्रकरणी मोठी अपडेट भाजपमधील बंडखोरांना तृणमूल काँग्रेसमध्ये घेण्याची जबाबदारी मुकुल रॉय यांच्यावर सोपवली आहे. दरम्यान पक्षातल्या लोकांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वानं महासचिव बीएल संतोष यांच्या नेतृत्त्वाखाली एक पथक संघटनात्मक बांधणीसाठी राज्यात पाठवल्याचं समजतंय. या समितीत आसाम, त्रिपुराचे भाजप संघटनेचे सचिव फणींद्रनाथ शर्मा, पूर्वोत्तर महासचिव अजय जामवाल, राज्य प्रभारी विनोद सोनकर यांचा समावेश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष माणिक साहा आणि सर्व जिल्ह्याध्यक्षांची ही समिती भेट घेईल. तसंच मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब, कॅबिनेट सहकारी आणि खासदारांचीही बैठक होईल. त्रिपुराचे लोक जागरुक असून ते बाहेरच्या पक्षांना उभं करणार नाहीत. या लोकांनी बंगालमध्ये टीएमसीनं केलेला हिंसाचार पाहिला आहे. त्यामुळे त्रिपुरामध्ये टीएमसीचे प्रयत्न यशस्वी होणार नाही. पक्षातल्या नेत्यांचं म्हणणं केंद्रीय नेतृत्त्वानं ऐकून घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम पक्षाचे नेतृत्त्व करत असल्याचं भाजप प्रवक्ते नबेंद्रु भट्टाचार्य म्हणालेत. तर पक्षात कोणतेही मतभेद नसून सर्व ठीक असल्याचं प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांनी म्हटलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Modi government, Narendra modi, TMC

    पुढील बातम्या