मराठी बातम्या /बातम्या /देश /धक्कादायक! Web series ने घेतला 12 वर्षीय मुलाचा जीव; नेमकं काय घडलं पाहा

धक्कादायक! Web series ने घेतला 12 वर्षीय मुलाचा जीव; नेमकं काय घडलं पाहा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

वेब सीरिजमुळे 12 वर्षीय मुलाने उचललं धक्कादायक पाऊल.

कोलकाता, 08 फेब्रुवारी : हल्ली मालिका, फिल्मप्रमाणे वेब सीरिज (Web series) पाहण्याचं प्रमाणही वाढलं आहे. विशेषत: तरुणांमध्ये वेब सीरिजची क्रेझ जास्त आहे. पण आता ऑनलाइन स्कूलमुळे लहान मुलांच्यांही हातात मोबाईल आल्याने तेसुद्धा असे वेब सीरिज पाहताना दिसतात. अशाच एका वेब सीरिजने एका 12 वर्षीय मुलाचा जीव घेतला आहे. कोलकात्यात घडलेली ही धक्कादायक घटना आहे (Child died after watching Web series).

पार्क सर्कसच्या फूल बागान परिसरात कॅनाल सर्कुलर रोडवरील हाय अँड हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये 11 मजली इमारतीखाली एक 12 वर्षांचा मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. बिराज पचीसिया असं या मुलाचं नाव आहे. त्याच्या घरात सरस्वती पूजन सुरू होतं. त्याच्या कुटुंबातील सदस्य या पूजेत व्यस्त होते. तेव्हा तो इमारतीच्या छतावर गेला आणि त्याने उडी मारली.

हे वाचा - तुमचा नवरा, बॉयफ्रेंड तुमचाच राहणार; हे औषध घेतल्यानंतर तो चीटिंग करणारच नाही

मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांनी सांगितलं की या मुलाला ऑनलाइन क्लाससाठी त्याला मोबाईल देण्यात आला होता. प्राथमिक तपासात मुलाला वेब सीरिज पाहण्याचं व्यसन होतं यामुळेच त्याने असं धक्कादायक पाऊल उचललं, हे स्पष्ट झालं आहे.

या मुलाने एक जपानी वेब सीरिज पाहिल्याची माहिती मिळते आहे. ही वेब सीरिज एका काल्पनिक कथेवर आधारित आहेत, ज्यात हिरो इमारतीवरून उडी मारतो तेव्हा एक परी त्याला वाचवते आणि मग हिरो चमत्कारीक शक्ती निर्माण करतो.

हे वाचा - मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर कोसळली बॉक्सिंग बॅग; रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले

हेच पाहून या मुलानेही त्या हिरोसारखी 11 मजली इमारतीवरून उडी मारली आणि तो जमिनीवर कोसळला. घटनेवेळी तिथं उपस्थित असलेले लोक तिथं धावत आले. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

First published:

Tags: Kolkata, Parents and child, Web series