Home /News /national /

उर्मिलानंतर या अभिनेत्रीने सोडलं काँग्रेस; सोनियांना पत्र लिहून भाजपत प्रवेश

उर्मिलानंतर या अभिनेत्रीने सोडलं काँग्रेस; सोनियांना पत्र लिहून भाजपत प्रवेश

सोनिया गांधींना पत्र लिहित या प्रसिद्ध अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर पुढचं पाऊल उचलत भारतीय जनता पक्षात प्रवेशही केला आहे.

    नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. उर्मिलाने इतर कुठल्याही पक्षात अद्याप प्रवेश केलेला नाही. पण आता दुसऱ्या एका अभिनेत्रीने सोनिया गांधींना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर पुढचं पाऊल उचलत भारतीय जनता पक्षात प्रवेशही केला आहे. प्रसिद्ध बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबूने(Khushbu Sundar) काँग्रेसचा हात सोडत कमळ हाती धरलं. काँग्रेसमधल्या अंतर्गत राजकारणाबद्दल सोनिया गांधी यांना पत्र लिहून खुशबू यांना नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. 'काँग्रेसमध्ये काम करताना वास्तवापासून दूर गेलेल्या काही नेत्यांनी आपल्याला सतत दाबून ठेवलं. काम करू दिलं नाही. त्यामुळे नाईलाजाने आपल्याला हे पाऊल उचलावं लागत आहे', असं पत्रात लिहून खुशबू यांनी काँग्रेसचा हात सोडला. सोमवारी खुशबू सुंदर यांनी दिल्लीत भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश केला. एके काळी काँग्रेसमध्ये असताना भाजपविरोधात तोफ डागणारी ही अभिनेत्री आता भाजपच्या गोटात दिसेल. खुशबू या राजकारणात नव्या नाहीत आणि त्यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे पक्ष बदलेला आहे, असंही नाही. पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका पण महिलांनी घेतला धसका; काय आहे कारण वाचा 2014 मध्ये खुशबू यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्याअगोदर त्या राजकारणात सक्रिय बहोत्या आणि द्रमुक पक्षात होत्या. 2019 मध्ये त्यांना काँग्रेसने तिकिट नाकारलं. तेव्हापासूनच त्या नाराज असल्याचं बोललं जातं. तेव्हापासूनच खुशबू भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. सेक्स रॅकेटची मास्टरमाइंड काँग्रेसची महिला नेता गजाआड; 20 दिवसांपासून होती फरार आता 2021 मध्ये तमिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप खुशबू यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. खुशबू यांना तमीळ चित्रपटांमधूनही मोठी लोकप्रियता मिळालेली आहे. दिवंगत तमीळ नेते पेरियार यांच्या पत्नीची भूमिका त्यांनी एका दाक्षिणात्य चित्रपटात केली होती. तत्कालीन सत्ताधारी पक्ष द्रमुक (DMK)या चित्रपटामागे होता. 2010 मध्ये खुशबू यांनी द्रमुक मध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्या भाजपच्या सदस्य झाल्या आहेत.
    First published:

    Tags: Congress, Sonia gandhi

    पुढील बातम्या