दहशतवादी मसूद अजहरला आणखी एक दणका, पाकने देखील घातली बंदी!

दहशतवादी मसूद अजहरला आणखी एक दणका, पाकने देखील घातली बंदी!

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने देखील त्याच्यावर बंदी घातली आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 02: जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने देखील त्याच्यावर बंदी घातली आहे. कालच संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते.

संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ला तसेच उरी आणि पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा मसूद मास्टरमाईंड होता. विशेष म्हणजे इतके दिवस या बाबत चीनने नकाधिकार वापरला होता. मात्र भारताच्या राजनैतिक रणनीतीला मोठे यश मिळाले आहे. अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याने त्याची सर्व संपत्ती जप्त केली जाईल.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी भारताने दबाव टाकला होता. याला चीनने अनेकदा विरोध केला होता. यासंदर्भातील फ्रान्सच्या प्रस्तावावर चीनने व्होटोचा अधिकार वापरला होता. त्यावर अमेरिकेसह जगभरातील अन्य देशांनी चीनवर टीका देखील केली होती.

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवलं म्हणजे नेमकं काय?

जैश-ए-मोहम्मदचा मोरक्या मसूद अजहर याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. फ्रान्सच्या या ठरावाला 151 देशांनी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे अजहरला दहशतवादी ठरवण्यासाठीच्या प्रस्तावाला दोन वेळा विरोध करणाऱ्या चीनने यावेळी भारताची साथ दिली. एखाद्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवले जाते म्हणजे नेमके काय होते हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने 1998मध्ये एक प्रस्ताव मंजूर केला होता. हा प्रस्ताव 1267 या नावाने ओळखला जातो. सुरक्षा परिषदेने हा ठराव अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी केला होता. दहशतवादी किंवा त्यांच्या संघटनांना आर्थिक मदत मिळू नये यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर गेल्या 20 वर्षात 100 हून अधिक दहशतवादी आणि संघटनांवर बंदी घालून त्यांची आर्थिक नाकेबंदी केली आहे.

एखाद्या दहशतवाद्याविरुद्ध किंवा संघटनेविरुद्ध हा ठराव मंजूर झाल्यानंतर त्याचे खालील परिणाम होतात.

1) आर्थिक नाकेबंदी- ज्या संघटना अथवा दहशतवाद्याविरुद्ध हा ठराव मंजूर होतो. त्याची सर्व बँक खाती सील केली जातात. ज्यामुळे कोणत्याही प्रकारची शस्त्रे अथवा अन्य कोणतेही गैर कृत्य करण्यासाठी त्यांना संधी मिळू नये.

2)देश सोडता येत नाही- आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवल्यानंतर संबंधित व्यक्तीला संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य असलेला कोणताही देश व्हिसा देत नाही. म्हणजेच तो ज्या देशात आहे. तो देश सोडून त्याला जाता येत नाही.

3) शस्त्र खरेदीवर मर्यादा- या ठरावानुसार संबंधित दहशतवादी ज्या देशात असतो त्या देशाने त्याला शस्त्रे मिळणार नाहीत याची काळजी घ्यावयाची असते. आता पाकिस्तानची ही जबाबदारी ठरते की तो मसूद अजहरला किती रोखू शकले.

याआधी हाफिस सईदला देखील आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र नंतर देखील तो दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. उरी आणि पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मसूद अजहर हात होता. त्याआधी भारताच्या संसदेवर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड अजहरच होता. 1999च्या कंदहार विमान अपहरणात त्याची सुटका झाली होती.

First published: May 2, 2019, 7:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading