मराठी बातम्या /बातम्या /देश /

Weather Alert! तौत्केनंतर ‘Yaas’ चक्रीवादळाचं अस्मानी संकट; या राज्यांमध्ये हाय अ‍लर्ट

Weather Alert! तौत्केनंतर ‘Yaas’ चक्रीवादळाचं अस्मानी संकट; या राज्यांमध्ये हाय अ‍लर्ट

Weather Update: तौत्के चक्रीवादळाचा (Tautkae Cyclone) महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा आणि केरळ या राज्यांना जबरदस्त फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामेही झाले नाहीत. तोपर्यंत देशासमोर आणखी एका चक्रीवादळाचा (Another cyclone alert) धोका निर्माण झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 19 मे: अलीकडेच अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाचा (Tautkae Cyclone) महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा आणि केरळ या राज्यांना जबरदस्त फटका बसला आहे. तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामेही झाले नाहीत. त्यातच आता देशासमोर आणखी एका चक्रीवादळाचा (Another cyclone alert) धोका निर्माण झाला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण होतं असून पुढील काही दिवसांत या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर चक्रीवादळात होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD alert) देण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, तौत्केनंतर बंगालच्या खाडीत उत्तर मध्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. परिणामी या कमी दाबाच्या पट्ट्याचं 23 आणि 24 मे रोजी वादळात रुपांतर होणार आहे. या वादळाचं नामकरणही करण्यात आलं असून ओमाननं या वादळाला ‘यस’ (Yaas Cyclone) असं नाव दिलं आहे. या वादळाचा देशाच्या दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीला सर्वात जास्त धोका आहे. पण हे वादळ आपल्या पट्ट्यात आल्यानंतर अधिक ठोस भाष्य करता येणार असल्याची माहिती, भारतीय हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

ओडिशा, अंदमान आणि पश्चिम बंगालला बसणार फटका

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे 23 आणि 24 मे रोजी संभाव्य वादळ निर्माण होणार आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका अंदमान निकोबार बेटांना, ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसणार आहे. दरम्यानच्या काळात याठिकाणी 140 ते 150 किमी प्रतितास इतक्या वेगानं वारं वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा-VIDEO : महाभयंकर तौत्के चक्रीवादळाचा प्रवास आणि लँडफॉल कसा होता?

अलीकडे आलेल्या तौत्के चक्रीवादळाचा जबरदस्त फटका गुजरात आणि महाराष्ट्राला बसला आहे. या चक्रीवादळात एकूण 14 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अरबी समुद्रात अडकलेल्या एका जहाजातील अनेक खलाशी बेपत्ता झाले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्याच काम अजूनही सुरू आहे. असं असताना Yaas या चक्रीवादळाचा आणखी एक धोका निर्माण झाला आहे.

First published:

Tags: Odisha, Weather forecast, Weather update, West bengal