Home /News /national /

छापेमारीनंतर लाचेचे पैसे घेऊन अधिकारी पळू लागला अन् मागे भ्रष्टाचार विरोधी पथक, 1 KM चालली 'धावाधाव'

छापेमारीनंतर लाचेचे पैसे घेऊन अधिकारी पळू लागला अन् मागे भ्रष्टाचार विरोधी पथक, 1 KM चालली 'धावाधाव'

नेमका काय प्रकार घडला?

    दिसपूर, 4 ऑगस्ट : आसामच्या सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी सतर्कता आणि भ्रष्ट्राचार विरोधी संचालनालयाकडून अभियान सुरू आहे. बुधवारी टीमने कछार जिल्ह्याच्या लखीपूर वन मंडलच्या रेंजरला लाच देताना रंगेहाथ अटक करण्यात आलं. छापेमारीची माहिती मिळताच रेंजर आपल्या ऑफिसातून पैसे घेऊन पळू लागले. मात्र टीमच्या काही जणांनी रेंजरला पकडलं आणि तातडीने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. आसाम कछार जिल्ह्यातील लखीपूर वन मंडलमधील पदस्थ रेंजर देवव्रत गोगोई यांच्यावर जंगताली संसाधनांच्या तस्करीच्या बदल्यात एका व्यापाऱ्याकडून कथितस्वरुपात लाच घेण्याचा आरोप केला जात होता. गुप्त सूचनेच्या आधारावर रेंजरला रंगेहाथ पकडण्यात आलं. छापेमारीचं वृत्त मिळताच रेंजर गोगोई आपल्या कार्यालयातून लाचेची रक्कम घेऊन फरार झाला. साधारण 1 किलोमीटरपर्यंत पाठलाग केल्यानंतर टीमने त्याला पकडलं. गोगोईने पळ काढण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र शेवटी भ्रष्ट्राचार विरोधी टीमने त्याला पकडलच. आसाम पोलिसांच्या विशेष महानिर्देशक जीपी सिंह यांनी या अभियानाबद्दल ट्विट केलं आहे. सध्या रेंजर गोगोईची चौकशी केली जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या