Elec-widget

पाकिस्तानच्या खासदाराचं कुंभ मेळ्यात स्नान, केलं मोदी सरकारचं कौतुक

पाकिस्तानच्या खासदाराचं कुंभ मेळ्यात स्नान, केलं मोदी सरकारचं कौतुक

  • Share this:

प्रयागराज 22 फेब्रुवारी :  पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव आहे. भारताच्या कारवाईची पाकिस्तानला भीती वाटतेय. तर हल्ला झाल्यास चोख उत्तर देऊ असं पाकिस्तानने म्हटलं आहे. अशा वातावरणात पाकिस्तानचं एक शिष्टमंडळ कुंभ मेळ्याच्या दौऱ्यावर आलं आहे. इथल्या व्यवस्थेचं आणि आदरातिथ्याचं त्यांनी कौतुक केलं आहे.


पाकिस्तानचे खासदार डॉ. रमेश कुमार हे एका शिष्टमंडळासह शुक्रवारी प्रयागराज इथं आले आले आहेत. त्यांनी पवित्र संगमात स्नाही केलं. इथल्या व्यवस्थेचं आणि नियोजनाबद्दल त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं तोंडफरून कौतुक केलं आणि धन्यवादही दिले आहेत.Loading...


या आधीही पाकिस्तानातले लोक कुंभ मेळ्यात आले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. केंद्र सरकारने विदेशी नागरिकांसाठी कुंभमेळ्याच्या निमित्ताने खास योजना राबवली होती. त्यात जगभरातल्या नागरिकांनी कुंभात स्नान केलं. त्याचाच भाग म्हणू पाकिस्तानचही शिष्टमंडळ भारतात आलं आहे.


सर्व भांडण कमी होऊन भारत आणि पाकिस्तानम्ये शांतता निर्माण व्हावी अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या शिष्टमंडळा  का बोलावण्यात आलं असा प्रश्न आता योगी सरकारला विचारण्यात येतोय. तर या शिष्टमंडळाला पाकिस्तानी शिष्टमंडळ म्हणून नाही तर सिंधी हिंदू म्हणून बोलावण्यात आल्याचं स्पष्टिकरण उत्तर प्रदेशचे मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 07:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...