धर्माची ओळख पटल्यानंतर अंकित शर्मांची हत्या, सलमानने सांगितलं ताहिरच्या घरातील धक्कादायक वास्तव

धर्माची ओळख पटल्यानंतर अंकित शर्मांची हत्या, सलमानने सांगितलं ताहिरच्या घरातील धक्कादायक वास्तव

IB अधिकारी अंकित शर्मा यांची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आली होती. याची हकीकत सलमानने पोलिसांसमोर सांगितली

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मार्च : दिल्ली हिंसाचारादरम्यान आयबी (IB) अधिकारी अंकित शर्मा (Ankit Sharma) यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात  आरोपी सलमान (Salman) यांच्या अटकेनंतर पोलिसांकडून त्याची जोरदार चौकशी केली जात आहे. या प्रकरणात सलमानने मोठा खुलासा केला आहे.

चौकशीदरम्यान सलमानने सांगितले की, सहा जणांनी मिळून आयबी अधिकारी अंकित शर्मा यांना आपचे माजी नगरसेवक ताहिर हुसैन (Tahir Hussain) यांच्या घरात खेचून आणले होते. यानंतर धर्माची ओळख पटवण्यासाठी त्यांना निर्वस्त्र केले. त्यानंतर चाकूने त्याच्या शरीरावर सपासप वार केले. सलमानने ही माहिती दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. एबीपी न्यूजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी हे वृत्त दिलं आहे. त्यानुसार, चौकशीदरम्यान सलमानने सांगितले की, तो आपल्या साथीदारांसह 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी ताहिर हुसैनच्या घरी पोहोचला होता. त्या दिवशी त्या भागात दगडफेक करण्यात आली होती आणि गोंधळ निर्माण केला होता.

संबंधित - अंकित शर्मांच्या हत्येचा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती, अमित शहांनी केला खुलासा

रिपोर्टमध्ये दिल्यानुसार सलमानने सांगितले की, 23 फेब्रुवारी रोजी सकाळी तो आपल्या साथीदारांसह सदर बाजाराजवळीत ईदगाहमध्ये गेला होता. तेथे जमातचे आय़ोजन करण्यात आले होते. त्या दिवशी दुपारी मौजपुर येथे दगडफेक झाली होती. यानंतर सर्वांना चांदबाग पोहोचविण्याचे सांगण्यात आले होते. सलमान 24 तारखेला चांदबाग गेला होता, येथे त्याने तारिक हुसैन यांच्या घरावरुन दगडफेक केली आणि लोकांवर पेट्रोल बॉम्ब टाकल्याने त्याने पोलिसांसमोर कबूल केले आहे.

अंकित शर्मा हे बेपत्ता झाल्याच्या एक दिवसांनंतर 27 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृतदेह उत्तर-पूर्व दिल्लीतील चांदबांग येथील त्याच्या घराजवळील एका नाल्यात सापडला. यापूर्वीच पोलिसांनी या प्रकरणात आम आदमी पार्टीचे निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन यांना अटक केले होते. हिंसाचार सुरू झाल्यानंतर जेव्हा सलमानला चांदबाग येथे जाण्यास सांगण्यात आले तेव्हा तो आपल्य़ा साथीदारासोबत बसमधून खजूरी चौकात पोहोचल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आहे.

रिपोर्टनुसार सलमानने पूर्ण घटनेची माहिती आपला भाऊ व वहिनीला दिली होती. याशिवाय सलमान या हिंसाचारात सहभागी असल्याचे त्याच्या फोनकॉलच्या डिटेल्सवरुन पोलिसांना कळाले होते.

संबंधित - खळबळजनक : CAA विरोधी दिल्लीतल्या हिंसाचारासाठी पाकिस्तानातून पैसा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2020 02:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading