मोठ्या वादंगानंतर मरकज प्रकरणाबाबत मोदी सरकारने घेतली महत्त्वपूर्ण भूमिका

सोशल मीडियावर संपूर्ण मुस्लीम समाजालाच टार्गेट करण्यात आलं. मात्र आता मोदी सरकारने याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे.

सोशल मीडियावर संपूर्ण मुस्लीम समाजालाच टार्गेट करण्यात आलं. मात्र आता मोदी सरकारने याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 9 एप्रिल : जगभरात हाहाकार उडवून देणाऱ्या कोरोना व्हायरसचा भारतातही वेगाने प्रादुर्भाव होत आहे. एकीकडे कोरोना व्हायरचा हा संसर्ग रोखण्याचं आव्हान देशासमोर असताना या संकटातही धार्मिक वाद सुरू झाला. दिल्लीतील निजामुद्दीन इथं झालेली मरकज हे त्यामागचं निमित्त ठरलं. मरकजमुळे देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत झाल्याने सोशल मीडियावर संपूर्ण मुस्लीम समाजालाच टार्गेट करण्यात आलं. मात्र आता मोदी सरकारने याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव होण्यास कुठल्या ठिकाणाला किंवा समाजाला दोषी ठरवू नये, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. दिल्लीच्या निझामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर मुस्लीम समाजावर सोशल मीडियातून टीका होत आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने एक पत्रक जारी केलं आहे. शरद पवारांनी थेट मोदींकडे केली होती मागणी कोरोनाच्या देशव्यापी संकटाला लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे मरकजवरून सुरू असलेल्या वादाबाबत मागणी केली होती. 'समाजातील काही घटक, मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये जातीयतेचा रंग देणे, दोन समाजांमध्ये भेदभाव व द्वेषाची भावना पसरवणे हा प्रकार होत असेल तर अशा शक्तींचा वेळीच बंदोबस्त करावा,' अशी विनंती शरद पवार यांनी केली होती. हेही वाचा- 'घराची रेकी झाली...माझी हत्या करण्याचे ठरले', जितेंद्र आव्हाडांनी जाहीररित्या मांडलं दु:ख नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर शरद पवार यांनी माध्यमांनाही याबाबत आवाहनक केलं होतं. 'मीडियाला देखील विनंती आहे एखादी गोष्ट पुनःपुन्हा दाखवून समाजामध्ये क्लेश निर्माण होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी,' असंही शरद पवार म्हणाले. संपादन- अक्षय शितोळे
First published: