• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Alert! तौत्केनंतर आता आणखी एका चक्रीवादळाचा धोका, पुढील आठवड्यात धडकणार

Alert! तौत्केनंतर आता आणखी एका चक्रीवादळाचा धोका, पुढील आठवड्यात धडकणार

तौत्के (Tauktae) चक्रीवादळानं गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक भागांना मोठा फटका बसला. अशात आता येत्या पाच दिवसात आणखी एक चक्रीवादळ येणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 20 मे : तौत्के (Tauktae) चक्रीवादळानं गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक भागांना मोठा फटका बसला. या वादळादरम्यान गुजरातमध्ये 13 तर महाराष्ट्रात 6 हून अधिक लोकांचा जीव मृत्यू झाला आहे. यातून लोक सावरत असतानाच आता अशी बातमी समोर आली आहे, की येत्या पाच दिवसात आणखी एक चक्रीवादळ येणार आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 23-24 मेच्या दरम्यान यास चक्रीवादळ (Cyclone Yaas) बंगालच्या उपसागरास धडकेल. यावेळी ओमानने या वादळाला नाव दिलं आहे. भारतीय हवामान खात्यातील चक्रीवादळ विभागाच्या प्रभारी सुनीता देवी म्हणाल्या की, पुढच्या आठवड्यात पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभाग परिस्थितीवर नजर ठेवून आहे. देवी म्हणाल्या, की बंगालच्या एसएसटी उपसागरापासून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 31 अंश आहे. हे सरासरीपेक्षा 1-2 अंश से. अधिक आहे. सर्व समुद्र आणि वातावरणीय परिस्थिती चक्रीवादळासाठी अनुकूल आहेत. दुसरीकडे गुजरातमध्ये तौत्केमुळे कमीत कमी तेरा लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर, अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं मोठं नुकसान केलं आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने मुंबईजवळील अरबी समुद्रात दोन बार्जमध्ये अडकलेल्या 317 लोकांना वाचवले आहे. मुंबईच्या समुद्रात वादळ येणार माहित असून कॅप्टनने 261 जणांना अडवले मंगळवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सोमवारी रात्री उशिरा गुजरातमध्ये चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस पडला आणि या काळात वेगवान वादळामुळे कित्येक खांब व झाडे उन्मळून पडली तसंच घरे व रस्त्यांनाही याचा फटका बसला. हवामान खात्याने सांगितले की, तौत्के सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातच्या किनारपट्टीवरुन 'अत्यंत तीव्र चक्रीय वादळ' म्हणून गेले आणि हळूहळू वेग कमी होऊन 'तीव्र चक्रीवादळा'मध्ये आणि नंतर 'चक्रीवादळा'मध्ये रुपांतरित झाले.
  Published by:Kiran Pharate
  First published: