पुलवामा हल्ल्याचे पडसाद, डेहराडूनमधून काश्मिरी डीनचं निलंबन

पुलवामा हल्ल्याचे पडसाद, डेहराडूनमधून काश्मिरी डीनचं निलंबन

देहराडून येथे आता खासगी कॉलेजमधील काश्मीरी डीनचं देखील निलंबन करण्यात आलं आहे.

  • Share this:

डेहराडून, 19 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी आणि काश्मिरी नागरिकांविरोधातील रोष काही कमी होताना दिसत नाही. पुलवामातील आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाल्यानंतर डेहराडून कॉलेजमधील काश्मीरच्या विद्यार्थ्यांचा वादग्रस्त मेसेज व्हायरल झाला. त्यानंतर विद्यार्थ्याचं निलंबन करण्यात आलं. तर, एका विद्यार्थ्याला समन्स पाठवण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणांमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांचं निलंबन केल्यानंतर आता खासगी कॉलेजमधील काश्मिरी डीनला देखील निलंबित करण्यात आलं आहे.

विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि बजरंग दलाच्या दबावापोटी ही कारवाई करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर डेहराडूनमध्ये काश्मीरी विद्यार्थ्यांविरोधात रोष वाढत आहे. काही विद्यार्थ्यांनी डेहराडूनहून काश्मीर जाणे पसंत केलं. तर, काही विद्यार्थ्यांनी खोलीमध्येच राहणं पसंत केलं आहे.

">

पुलवामा हल्ला आणि...

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर डेहराडूनमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांविरोधात रोष वाढला. विद्यार्थ्यांना डेहराडून सोडून जाण्यात सांगण्यात आलं. कॉलेजबाहेर निदर्शनं केली जात आहेत. त्यामुळे कॉलेजबाहेर सुरक्षा व्यवस्था देखील वाढवली गेली आहे. चंदीगडमध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

काश्मीरच्या विद्यार्थ्यांविरोधातील रोष पाहता विद्यार्थ्यांनी काश्मीर गाठणं पसंत केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात देखील मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली जात आहेत. शिवाय, अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पाळला जात आहे.

40 जवान शहीद

पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 40 जवान शहीद झाले. स्फोटकांनी भरलेला ट्रक जवानांच्या गाडीवर आदळून हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. यानंतर लष्करानं त्वरीत पावलं उचलत पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या दोन दहशतवाद्यांचा सोमवारी खात्मा केला. पण, यामध्ये 4 जवान शहीद झाले.

VIDEO : हवाई दलाचे दोन 'सूर्य किरण' समोरासमोर धडकले

First published: February 19, 2019, 5:06 PM IST

ताज्या बातम्या