श्रीलंकेनंतर भारतातली मंदिरं आणि चर्चेस ISच्या निशाण्यावर

श्रीलंकेनंतर भारतातली मंदिरं आणि चर्चेस ISच्या निशाण्यावर

ISने भारतात आपला स्लिपर सेल तयार केलाय. त्याच्या माध्यमातून नवीन तरुणांना भडकवून त्यांना दहशतवादासाठी तयार केलं जातं.

  • Share this:

नवी दिल्ली 21 जून : श्रीलंकेत एप्रील महिन्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर आता भारतात धोका वाढला आहे. इस्लामीक स्टेट म्हणजेच IS ने आता भारतावर आपलं लक्ष केंद्रीत केल्याची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली आहे. भारतातली मंदिरं आणि चर्चेस IS च्या निशाण्यावर आहेत. श्रीलंकेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे NIA ने नुकतच तामिळनाडूतल्या कोयंबतूरमधून IS च्या 4 समर्थकांना अटक केलीय त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली असून देशभर संशयितांवर नजर ठेवण्यात येत आहे.

कोयंबतूरला ज्या 4 लोकांना अटक करण्यात आली होती त्यात श्रीलंका हल्ल्याच्या मुख्य आरोपी जरान हाशिमीचा  फेसबुक मित्र मोहम्मद अजरुदीनचाही समावेश आहे. त्याचबरोबर शाहजहां, मोहम्मद हुसैन आणि शेख सैफुल्लाहला अटक करण्यात आलीय.

भारतातल्या धार्मिक स्थळांवर हल्ले करून तणाव वाढवलं आणि सामाजिक शांतता भंग करण्याचा या दहशतवाद्यांचा डाव आहे. ISने भारतात आपला स्लिपर सेल तयार केलाय. त्याच्या माध्यमातून नवीन तरुणांना भडकवून त्यांना दहशतवादासाठी तयार केलं जातं.

केरळमधूनही झाली होती अटक

2016 मधील ISIS कासरगोड मॉडयूल प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने काही महिन्यांपूर्वी केरळमधून रियास अबुबाकर याला पालकड येथून अटक केली होती. NIAने केलेल्या चौकशीत रियास याने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. रियासला श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे केरळमध्ये आत्मघाती हल्ले करायचे होते. तसेच तो ISIS या दहशतवादी संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांशी इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात होता.

गुप्तविभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर NIAने केरळमधील 3 ठिकाणी छापे टाकले होते. यातील दोन छापे कासरगोड आणि एक छापा पालकाड जिल्ह्यात टाकण्यात आला होता. NIAच्या चौकशीत रियासने काही दिवासांपूर्वी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माईंड जाहरान हाशिम यांचे व्हिडिओ रियास पाहत होता. रियास हा हाशिम पासून प्रभावित झाला होता आणि त्याला केरळमध्ये आत्मघाती हल्ले करायचे होते. तो दहशतवादी अब्दुल रशीद अब्दुल्ला याच्याशी ऑनलाईन नेहमी संपर्कात होता. भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देण्याचे काम करत होता, अशी कबूली रियासने NIAकडे दिली होती.

NIAकडे श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात काही माहिती असल्याचे सांगण्यात आलं होतं. ही माहिती श्रीलंकन सरकारला देण्यात आली होती. रियास हा झाकिर नाईकचे भाषण ऐकत असल्याचे देखील चौकशीतून समोर आलं होतं.

केरळमधील 15 युवक ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी केल्याचे वृत्त होते. यातील 14 युवक अफगाणिस्तानमध्ये तर एक जण सिरियात गेल्याची सूत्रांची माहिती होती. या प्रकरणी NIAने जुलै 2016मध्ये गुन्हा दाखल केला होता. हे सर्व युवक केरळमधील कासरगोड जिल्ह्यातील होते. ISISच्या या कासरगोड मॉडयूल प्रकरणी NIAकडून चौकशी सुरु होती.

First published: June 21, 2019, 12:01 PM IST
Tags: ISIS

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading