BIG NEWS: शिवसेनेनंतर आता भाजपचा सर्वात जवळचा मित्रपक्षही NDAमधून बाहेर

BIG NEWS: शिवसेनेनंतर आता भाजपचा सर्वात जवळचा मित्रपक्षही NDAमधून बाहेर

आपल्यापासून मित्र पक्ष का दुरावत चालले आहेत याचा भाजपने विचार करावा असं या आधीच शिवसेनेने भाजपला सुनावलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 26 सप्टेंबर: केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. अकाली दलाच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर पक्षाने आता दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दशकांची मैत्री तोडत पक्षाने केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेनंतर भाजपशी काडीमोड घेणारा अकाली दल हा भाजपचा सगळ्यात जवळचा मित्र आहे.

केंद्र सरकारने आणलेली कृषी विधेयके ही शेतकरी विरोधी आहेत त्यामुळे ती मागे घेतली जावीत अशी मागणी अकाली दलाने केली होती. त्यावरून पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलनही उभं राहिलं आहे. त्यामुळे पक्षाची अडचण होऊ नये म्हणून अकाली दलाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

शिवसेना आणि अकाली दल हे भाजपचे सर्वात जवळे मित्र म्हणून त्यांची ओळख होती. विधानसभा निवडणुकीनंतर बेबनाव झाल्याने शिवसेना भाजपपासून दुरावला गेला. त्यामुळे भाजप शिवसेनेची 27 वर्षांची युती तुटली होती.

पंजाबमध्ये अकाली आणि भाजपची युतीही अशीच मजबूत समजली जात होती. मात्र अंतर्गत राजकारण आणि नवी समिकरणे यामुळे अकाली दलाने हा निर्णय घेतला आहे.

अकाली दलाने NDAमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी केंद्र सरकारचा पाठिंबा काढण्यावर मात्र कुठलंही मत व्यक्त केलेलं नाही. भाजपला पूर्ण बहुमत असल्याने केंद्र सरकारला धोका नाही.

आपल्यापासून मित्र पक्ष का दुरावत चालले आहेत याचा भाजपने विचार करावा असं या आधीच शिवसेनेने भाजपला सुनावलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 26, 2020, 11:07 PM IST

ताज्या बातम्या