मराठी बातम्या /बातम्या /देश /

शिवसेना आणि अकाली दलानंतर आणखी एक पक्ष NDAमधून बाहेर, भाजपला धक्का

शिवसेना आणि अकाली दलानंतर आणखी एक पक्ष NDAमधून बाहेर, भाजपला धक्का

2017मध्ये गोरखा मुक्ती मोर्चाने एका पोलिसाची हत्या केली होती तेव्हापासून गुरुंग हे भूमिगत झाले होतो. आज अचानक कोलकत्यात यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.

2017मध्ये गोरखा मुक्ती मोर्चाने एका पोलिसाची हत्या केली होती तेव्हापासून गुरुंग हे भूमिगत झाले होतो. आज अचानक कोलकत्यात यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.

2017मध्ये गोरखा मुक्ती मोर्चाने एका पोलिसाची हत्या केली होती तेव्हापासून गुरुंग हे भूमिगत झाले होतो. आज अचानक कोलकत्यात यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.

  • Published by:  Ajay Kautikwar

नवी दिल्ली 21 ऑक्टोबर: लोकसभा निवडणुकीतल्या ऐतिहासिक यशाला वर्ष उलटत नाही तोच एक एक पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडत आहे. भाजपचे सर्वात जवळचे आणि जुने मित्रपक्ष असलेले शिवसेना आणि अकाली दल हे भाजपला सोडून NDAमधून बाहेर पडले. त्यानंतर आता पूर्वेतल्या राज्यांमधला एक पक्ष NDAमधून बाहेर पडला आहे. गोरखा जनमुक्ति मोर्चा (Gorkha Janmukti Morcha) असं या पक्षाचं नाव असून बिमल गुरुंग (Bimal Gurung) यांनी बुधवारी ही घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने गोरखालँडसाठी जी काही आश्वासने दिली होती ती आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे आम्ही बाहेर पडत असल्याचं गुरुंग यांनी सांगितलं. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली असून विधान सभा निवडणुका तृणमूलसोबत लढविण्याची घोषणाही गुरुंग यांनी केला आहे.

2017मध्ये गोरखा मुक्ती मोर्चाने एका पोलिसाची हत्या केली होती तेव्हापासून गुरुंग हे भूमिगत झाले होतो. आज अचानक कोलकत्यात यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. कोलकता पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध लुक आऊट नोटीस बजावली होती.

गुरुंग हे तृणमूलसोबत गेल्याने दार्जिलिंगमध्ये ममता बॅनर्जींना त्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांवरून अकाली दलाच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर पक्षाने आता दुसरा मोठा निर्णय घेत एनडीएमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दशकांची मैत्री तोडत पक्षाने केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेनंतर भाजपशी काडीमोड घेणारा अकाली दल हा भाजपचा सगळ्यात जवळचा मित्र आहे.

केंद्र सरकारने आणलेली कृषी विधेयके ही शेतकरी विरोधी आहेत त्यामुळे ती मागे घेतली जावीत अशी मागणी अकाली दलाने केली होती. त्यावरून पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलनही उभं राहिलं आहे. त्यामुळे पक्षाची अडचण होऊ नये म्हणून अकाली दलाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

शिवसेना आणि अकाली दल हे भाजपचे सर्वात जवळे मित्र म्हणून त्यांची ओळख होती. विधानसभा निवडणुकीनंतर बेबनाव झाल्याने शिवसेना भाजपपासून दुरावला गेला. त्यामुळे भाजप शिवसेनेची 27 वर्षांची युती तुटली होती.

First published:

Tags: NDA, Shivsena