शाहीनबागनंतर आता जाफराबाद...रस्त्यावर उतरल्या महिला, मेट्रो स्थानक ठप्प

शाहीनबागनंतर आता जाफराबाद...रस्त्यावर उतरल्या महिला, मेट्रो स्थानक ठप्प

आंदोलन करणाऱ्या महिलांनी हातात तिरंगा घेतला आहे आणि त्या स्वातंत्र्याच्या घोषणा देत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने जाफराबाद मेट्रो स्टेशनचा प्रवेश व एग्जिट गेट बंद केला आहे. या स्टेशनवर मेट्रो थांबविण्यात येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. नागरिकत्व संशोधन कायदा (Citizenship Amendment Act) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा (National Register of Citizens) विरोध करण्यासाठी राजधानी दिल्लीतील जाफराबाद मेट्रो स्टेशनजवळ शनिवारी रात्रीपासून मोठ्या संख्येने महिला विरोध प्रदर्शन करीत आहेत.

500 हून अधिक विरोधकांनी दिल्ली रोड ब्लॉक केला आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत केंद्र सरकार सीएए कायदा मागे घेत नाही तोपर्यंत ते रस्त्यावरुन हटणार नाहीत. हा रस्ता सीलमपुरला मिर्झापूर आणि यमुवा विहारशी जोडतो. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने जाफराबाद मेट्रो स्टेशन क्षेत्रात मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात केलं आहे.

शेकड़ोंमध्ये महिला या जाफराबाद मेट्रो स्थानकाजवळील रस्त्य़ावर उतरल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नागरिकत्व संशोधन कायदा (Citizenship Amendment Act) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा (National Register of Citizens) विरोध करणाऱ्या या महिलांनी हातात तिरंगा घेतला आहे आणि स्वातंत्र्याच्या घोषणा देत आहेत. जोपर्यंत केंद्र सरकार सीएएला रद्द करत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे महिलांनी सांगितले. शाहीन बाग परिसरात गेल्या दोन महिन्यांहून जास्त कालावधीपासून महिला हायवेवर आंदोलन करीत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून शाहीनबागमध्ये आंदोलन

15 डिसेंबरपासून शाहीनबागमध्ये नागरिकत्त्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. आंदोलकांमध्ये मुख्यत: महिलांचा समावेश आहे. CAA रद्द करण्यात यावं ही या आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे NRCला देखील या आंदोलकांचा विरोध आहे. मात्र सरकारकडून वेळोवेळी दावा करण्यात आला आहे की हा कायदा नागरिकत्त्व हिरावून घेणारा नसून नागरिकत्त्वाचं रक्षण करणारा कायदा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2020 12:29 PM IST

ताज्या बातम्या