मराठी बातम्या /बातम्या /देश /

बाप रे बाप! घराच्या वीज बिलाने दिला 420 व्होल्टचा झटका; Electricity Bill पाहताच व्यक्ती रुग्णालयात

बाप रे बाप! घराच्या वीज बिलाने दिला 420 व्होल्टचा झटका; Electricity Bill पाहताच व्यक्ती रुग्णालयात

एका घराचं बिल इतकं आलं आहे आकडा पाहून तुम्हालाही चक्कर येईल.

एका घराचं बिल इतकं आलं आहे आकडा पाहून तुम्हालाही चक्कर येईल.

एका घराचं बिल इतकं आलं आहे आकडा पाहून तुम्हालाही चक्कर येईल.

    भोपाळ, 27 जुलै : घराचं वीज बिल फार फार किती येईल. काही हजारांच्या घरात. पण एका व्यक्तीच्या घरातील वीज बिल इतकं आलं की विजेच्याही धक्क्यापेक्षा कित्येक पट अधिक शॉक या वीज बिलाच्या आकड्याने दिला. इलेक्ट्रिसिटी बिल पाहताच व्यक्तीला 420 व्होल्टचा झटका बसला आणि ती व्यक्ती थेट रुग्णालयात पोहोचली. आकडा पाहून तर तुम्हालाही जोर का झटका बसेल. मध्य प्रदेशच्या ग्वालिअरमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. माहितीनुसार प्रियंका गुप्ताच्या नावावर हे घर आहे. ही महिला गृहिणी आहे. तिचे पती संजीव कनकने वकील आहेत. संजीव यांनी सांगितल्यानुसार, वीज बिल पाहतातच त्यांच्या पत्नीचं ब्लड प्रेशर खूप वाढलं. त्यांचे सासरे हार्ट पेशंट आहेत. त्यांना इतका मोठा धक्का बसला की रुग्णालयात दाखल करावं लागलं. हे वाचा - Akola : महावितरणाच्या कारभारामुळे अकोलाकरांचा जीव धोक्यात, पाहा VIDEO आता इतका वीज बिलाचा आकडा नेमका होता तरी किती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वीज बिलाच्या मेसेजचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात तुम्ही पाहाल तर हा आकडा 34195325293 असा आहे. आकडा वाचतानाच आपलं तोंड दुखतं. अब्जावधीच्या घरात हे घराचं वीज बिल आहे. कितीही उपकरणं वापरली तरी एका घराचं इतकं बिल येणं शक्यच नाही. त्यामुळे हा आकडा पाहून कुणालाही धक्काच बसेल. अखेर वीज विभागाने त्यांचं बिल पुन्हा तपासलं आणि त्यानंतर जो आकडा आला तो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. प्रियंका यांच्या घराचं बील फक्त 1300 रुपये आलं होतं. त्यानंतर वीज विभागाने आपली चूक मान्य केली. हा एक ह्युमन एरर असून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं आहे. एका अधिकाऱ्यांचं निलंबन कऱण्यात आलं आहे, तर ज्युनिअर इंजिनीअरला कारणे दाखवा नोटीस जारी केल्याचं सांगितलं. हे वाचा - रिझर्व्ह बँक आणखी एक झटका देण्याची शक्यता; महागाईने त्रस्त नागरिकांवर पुन्हा EMI चा भार वाढणार? पण त्यांच्या या छोट्याशा चुकीमुळे कुटुंबाला मोठा फटका सहन करावा लागला. हेप्रकरण सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. नेटिझन्सनी यावर संताप व्यक्त केला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Electricity, Electricity bill, Madhya pradesh

    पुढील बातम्या