साध्वींनंतर आता नथुराम गोडसेबद्दल आणखी एक वक्तव्य, भाजप आमदार म्हणतात...

साध्वींनंतर आता नथुराम गोडसेबद्दल आणखी एक वक्तव्य, भाजप आमदार म्हणतात...

महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता, असं वक्तव्य करून साध्वी प्रज्ञासिंह यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली. यानंतर आता भाजपच्या एका आमदारांनीही नथुराम गोडसेबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलंय.

  • Share this:

बलिया (उत्तर प्रदेश), 28 नोव्हेंबर : महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता, असं वक्तव्य करून साध्वी प्रज्ञासिंह यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली. यानंतर भाजपने त्यांना संरक्षण समितीतून काढून टाकलं. पण हे सगळं शांत होत नाही तोच आता भाजपचे एक आमदार सुरेंद्र सिंह यांनीही नथुराम गोडसेबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. नथुराम गोडसेने चूक केली पण तो दहशतवादी नव्हता, असं त्यांनी म्हटलंय. आमदार सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशातल्या बैरिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

या वक्तव्याचं समर्थन नाही

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकारांना सांगितलं, साध्वी प्रज्ञासिंह यांनी नथुराम गोडसेबदद्ल केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. भाजपचं या वक्तव्याला समर्थन नाही, या विचारसरणीचंही समर्थन करत नाही, असंही ते म्हणाले होते. आता भाजप या आमदारावर काही कारवाई करतं का हे पाहावं लागेल.

(हेही वाचा : या काँग्रेस नेत्याने शपथविधीआधी उद्धव ठाकरेंना तुरुंगातून दिला सल्ला)

उत्तर प्रदेशातले भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आता त्यांनी नथुराम गोडसेबद्दल साध्वींनी केलेल्या वक्तव्याची री ओढली. साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई हल्ल्यातले शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान करून राळ उडवून दिली होती. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे एकच गदारोळ झाला. साध्वी प्रज्ञा यांची संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या सल्ल्गारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावर एकच टीका झाली. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर संसदीय समितीमधून त्यांना काढून टाकण्यात आलं आहे.

=================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 07:48 PM IST

ताज्या बातम्या