मराठी बातम्या /बातम्या /देश /West Bengal Election: राहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय

West Bengal Election: राहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee) यांनीदेखील निवडणुकीसाठी घेण्यात येणाऱ्या रॅलींबाबत मोठी घोषणा केली आहे.

नवी दिल्ली 19 एप्रिल : देशात झपाट्यानं होत असलेल्या कोरोनाच्या (Corona in India) प्रसाराचा परिणाम पश्चिम बंगालमधील निवडणुकीवरही (West Bengal Assembly Elections)होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीदेखील निवडणुकीसाठी घेण्यात येणाऱ्या रॅलींबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं, की इतर टप्प्यातील मतदानासाठी त्या निवडणूक प्रचार करणार नाहीत. टीएमसी खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी ट्विट करत याबाबातची माहिती दिली आहे, की ममता बॅनर्जी आता कोलकोतामध्ये निवडणूक प्रचार करणार नाहीत.

डेरेक ओ ब्रायन यांनी ट्विट करत सांगितलं, की बंगाल निवडणुकीच्या दरम्यान कोरोना ज्या वेगानं वाढत आहे ते पाहाता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता कोलकातामध्ये प्रचार करणार नाहीत. त्या केवळ निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रतिकात्मक पद्धतीनं एक बैठक घेतील. याशिवाय ज्याठिकाणी आधीपासूनच रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे, तिथे वेळ कमी करुन केवळ 30 मिनिटांमध्ये रॅली संपवली जाईल.

प्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू

याआधीही राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती, की बंगालमधील उरलेल्या सर्व टप्प्यातील मतदान एकदाच घेण्यात यावं. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आपल्या सर्व प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत राहुल गांधी यांनी इतर राजकीय नेत्यांनाही कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता आपल्या प्रचारसभा रद्द करण्याचं आवाहन केलं आहे.

राहुल गांधी यांनी याबाबत एक ट्विट करत म्हटलं होतं, की कोरोनाचं संकट पाहात मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व रॅली रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्षांनी याचा विचार केला पाहिजे, की सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या रॅलीमुळे जनतेला आणि देशाला किती मोठा धोका आहे.

First published:
top videos

    Tags: Elections, Mamata banerjee, Politics, Rahul gandhi, West Bengal Election