मुंबई, 07 जुलै : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव आणि राहुल गांधी यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा या दोन बाबी काँग्रेससाठी धक्कादायक अशाच म्हणाव्या लागतील. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली. त्यामुळे लोकसभेत देखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विजयची आशा काँग्रेसला होती. पण, देशातील जनतेनं मात्र काँग्रेसला साफ नाकारलं आणि काँग्रेसचा दारूण पराभव झाला. अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यासाठी ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस नेत्यांनी केलेला मनधरणीचा प्रयत्न देखील फोल ठरला. काँग्रेसमध्ये आतापर्यंत 140 नेत्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. त्यामध्ये प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांचा भरणा अधिक आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या जवळचे असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील काँग्रेस महासचिव पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे प्रियंका गांधी देखील राजीनामा देणार का? अशी चर्चा आता दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यासाठी प्रियंका गांधींवर दबाव वाढत असल्याचं देखील बोललं जात आहे.
कर्नाटकनंतर मध्य प्रदेशात देखील सरकार धोक्यात?
काय असणार प्रियंका गांधींचा निर्णय?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं प्रियंका गांधी यांची काँग्रेसची सरचिटणीस म्हणून निवड केली. शिवाय. त्यांच्या खांद्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देत ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली. पण, प्रियंका गांधी मात्र मतदारांना आपलंस करण्यास अयशस्वी ठरल्या. उत्तर प्रदेशमध्ये देखील काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पराभवाची जबाबदारी स्वीकारत ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा पक्षाकडे सादर केला. त्यामुळे प्रियंका गांधी यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
Air Strikeनंतर दहशतवाद्यांना पळता भूई थोडी; या ठिकाणी हलवले तळ
अध्यक्षपदासाठी नावाची शिफारस
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रियंका गांधी यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याची इच्छा काही नेत्यांनी व्यक्त केली. पण, राहुल गांधींनी मात्र काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी कुटुंबातील नसावा अशी अट ठेवली. सध्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवाराच्या शोधात आहे.
VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Priyanka gandhi, Rahul gandhi