नवी दिल्ली, 21 जुलै: पंजाब, राजस्थान आणि हरियाणा येथील काँग्रेस पक्षातील (Congress Party) वाद अद्यापही शमला नसताना आता कर्नाटक (Karnataka) आणि महाराष्ट्राने (Maharashtra) काँग्रेस नेत्रृत्वाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता दोन्ही राज्यांतील काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींनी दिल्लीत बोलावले आणि चर्चा केली. महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी दुपारी राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी राज्याचे प्रभारी एच के पाटील सुद्धा उपस्थित होते. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि महाविकास आघाडीतील धुसफूस या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
नाना पटोले यांच्याकडून करण्यात येणारे वक्तव्य यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील माहिती सुद्धा प्रभारी एच के पाटील यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिली असल्याचं वृत्त आहे. या बैठकीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या हितासाठी आणि आघाडी धर्माचे पालन करण्याच्या सर्वांना सूचना दिल्या आहेत. तसेच आघाडीत मतभेद होतील असे अनावश्यक वक्तव्य टाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
VIDEO: गणपती बाप्पाची आरती जितेंद्र आव्हाडांकडून मात्र कायद्याचा प्रसाद कार्यकर्त्यांना
कर्नाटकातही धुसफूस
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांच्यात धुसफूस सुरू आहे. कर्नाटकमध्ये 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा चेहरा कोण असणार यावरुन गटबाजी उफाळून आली आहे. पक्षातील सूत्रांच्या मते, सिद्धरमय्या यांनी राज्यातील सीमावर्ती भागात दौरे करताना आपण मुख्यमंत्री बनण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress