सर्जिकल स्टाईकच्या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले, सीमेवर सुरु केल्या हालचाली

सर्जिकल स्टाईकच्या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले, सीमेवर सुरु केल्या हालचाली

केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा सर्जिकल स्टाईक करेल याच्या भीती पोटी पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी: पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांच्या मनात पाकिस्तानबद्दल प्रचंड राग आहे. पाकपुरस्कृत या दहशतवादी हल्ल्याला योग्य आणि कठोर उत्तर देण्याची मागणी देशातील नागरिकांकडून होत आहे. भारतातील नागरिकांच्या या मागणीची आता पाकिस्तानला भीती वाटत आहे. केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा सर्जिकल स्टाईक करेल याच्या भीती पोटी पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच एलओसी अर्थात प्रत्यक्ष ताबा रेषाजवळच्या दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड हटवण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक म्हणजे दहशतवाद्यांकडून वापरले जाणारे हे लॉन्चपॅड पाक लष्कराच्या कॅंम्पमध्ये ठेवले जाणार आहेत.

वाचा- पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात; आत्मघाती हल्लेखोराला दिले होते प्रशिक्षण

पुलवामा हल्ल्यानंतर मोदी सरकारने हे स्पष्ट केले होते की जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या विरोधात कारवाई करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य लष्कराला देण्यात आले आहेत. त्याच बरोबर पंतप्रधान मोदींनी काल महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पाकिस्तानला थेट इशारा दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्कराने हलचाली सुरु केल्या आहेत. सध्या दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव आहे. काश्मीरमधील गु्प्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सीमेवर आर्टिलरी तैनात करण्याच्या हलचाली दिसत नाहीत.

पाहा: 'कुणी नाही वाचलं', Pulwama Attack चा काही क्षणानंतरचा EXCLUSIVE VIDEO

प्रत्यक्ष ताबा रेषेच्या जवळ हवाई हल्ले करण्याचा पर्याय भारताला वापरता येणार नाही. कारण येथील दहशतवादी कॅम्प हटवण्यात आले आहेत. अशाच कॅम्प दहशतवादी तयार केले जातात आणि त्यांना भारतात पाठवले जाते. त्यामुळे भारताकडे एकच पर्याय शिल्लक राहतो तो म्हणजे पाकिस्तान लष्कराच्या ठिकाणांवर हल्ले करण्याचा. पण त्यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

वाचा- पुलवामा स्फोटात नवा खुलासा, इब्राहिम अझर हाच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती

पाकिस्तानला असे वाटत आहे की, पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून एखादी कारवाई होऊ शकते. त्यामुळेच पाकने यावर्षी हिवाळ्यात सीमेवरील चौक्या कायम ठेवल्या आहेत. सूत्रांच्या मते पाकिस्तान दर वर्षी हिवाळ्यात सीमेवरील 50 टक्के चौक्यांवरील जवानांना माघारी बोलवते. पण यावेळी तसे करण्यात आले नाही. या सर्व चौक्यावर दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड ठेवण्यात आल्याचे समजते.

Special Report : शिर्डीचं साई संस्थान देणार शहिदांच्या कुटुंबियांना 2.5 कोटी

First published: February 17, 2019, 11:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading