News18 Lokmat

पुलवामानंतर भारताला समुद्रमार्गे पाकिस्तानला शिकवायचा होता धडा; युद्धनौका होत्या अरबी समुद्रात! Pulwama Attack | Nuclear Submarine | Pakistan

एअर स्ट्राईकसोबत भारताने पाकला समुद्रमार्गाने धडा शिकवण्याची तयारी केली होती.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 07:51 AM IST

पुलवामानंतर भारताला समुद्रमार्गे पाकिस्तानला शिकवायचा होता धडा; युद्धनौका होत्या अरबी समुद्रात! Pulwama Attack | Nuclear Submarine | Pakistan

नवी दिल्ली, 24 जून: पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवला. भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईककरून पाकला आणि दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवली. एअर स्ट्राईकसोबत भारताने पाकला समुद्रमार्गाने धडा शिकवण्याची तयारी केली होती. भारताने नौदलाचे  युद्धाभ्यास थांबवले होते. अण्विक आणि अन्य पारंपारिक शस्त्रसज्जता असणाऱ्या पाणबुड्या पाकच्या सीमेजवळ तैनात केल्या होत्या. भारताच्या या धोरणामुळे पाकिस्तानला वाटत होते की भारत कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने केवळ हवाईच नाही तर समुद्र मार्गे पाकिस्तानला धडा शिकवण्याची तयारी केली होती. बालाकोट येथे झालेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून हल्ला होण्याची शक्यता होती. पाकने त्यांची सर्वात आधुनिक अशी अगोस्ट श्रेणीतील पाणबुडी-'पीएनएस साद' कराची येथून हलवली होती. ही पाणबुडी कराची बंदरावर नसल्याचे माहिती भारताच्या हाती लागली. मोठ्या कालावधीसाठी पाण्यात राहण्याची क्षमता असलेल्या या पाणबुडीचे अचानक गायब होण्याने भारतीय नौदल अलर्ट झाले. कराचीपासून गायब झालेली ही पाणबुडी गुजरातच्या किनारपट्टीवर 3 दिवसात येऊ शकते. तर मुंबईजवळ पोहोचण्यासाठी तिला 5 दिवस पुरेसे आहेत. ही घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे भारत अधिक अलर्ट झाला.  मुंबईत नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय देखील आहे.

या बेपत्ता पाणबुडीचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदल कामाला लागले. यासाठी 'पी-8 आयएस'ला पाकिस्तानच्या पाणबुडीचा शोध घेण्याच्या कामावर लावण्यात आले. त्याच बरोबर विमानांद्वारे देखील शोध कामाला गती देण्यात आली. अण्विक सज्जता असलेल्या 'आयएनएस चक्र' आणि स्कॉर्पिन श्रेणीची 'आयएनएस कलवरी' यांना देखील शोध मोहिमेसाठी वापरण्यात आले. अखेर 21 दिवसांनी  'पीएनएस साद' पाकच्या पश्चिम किनारपट्टीवर आढळली.

लपवून ठेवण्यात आली होती...

पाकिस्तानने 'पीएनएस साद'ला लवून ठेवले होते. जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर त्याचा वापर करता येईल अशी पाकिस्तानची योजना होती. भारतावर समुद्रमार्गे हल्ला करण्यासाठी पीएनएस सादचा वापर करता येईल अशी पाकिस्तानची योजना होती. पण भारताने पीएनएस सादचा शोध घेऊन पाकचा डाव उधळून लावला.

Loading...

बालोकोट एअर स्ट्राईकनंतर अरबी समुद्रातील नौदलाच्या हालचाली वाढल्या होत्या. भारताने 60 युद्धनौका अरबी समुद्राच्या उत्तर भागात तैनात केल्या होत्या. यात लढाऊ विमानांना वापर करता येईल अशा 'आयएनएस विक्रमादित्य'चा देखील समावेश होता. या सर्व युद्ध नौकांची नजर केवळ आणि केवळ पाकिस्तानच्या सीमेवर होती.

VIRAL FACT: पिसाळलेल्या कुत्र्याचा 'तो' व्हिडिओ मुंबईतला? हे आहे सत्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 07:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...