नवी दिल्ली, 20 एप्रिल : विंग कमांडर अभिनंदन! पाकिस्तानात घुसून भारतानं एअर स्ट्राईक केला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननं देखील भारतावर हल्ला केला. पण, भारतानं पाकिस्तानचा हल्ला परतवून लावत विमानांना पाकिस्तानच्या हद्दीत पिटाळून लावलं. या साऱ्या घडामोडीमध्ये भारतानं पाकिस्तानचं एफ-16 हे विमानं पाडलं. तर, मिग-21 क्रॅश झाल्यानं विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं. पण, भारताचा, आंतरराष्ट्रीय दबाव पाहता पाकिस्ताननं अभिनंदन यांना सोडून दिलं. अखेर वाघा बॉर्डरवरून भारताचा ढाण्या वाघ अभिनंदन भारतात दाखल झाले. त्यांच्यावर चेन्नईतील रूग्णालयात उपचार करण्यात आले.
दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन आता विमान चालवणार का? याची उत्सुकता साऱ्या भारतीयांनी लागून राहिली होती. पण, तुम्हा सर्वांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण, विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर आता वायु दलानं नवी जबाबदारी दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांना श्रीनगर येथे न ठेवता त्यांच्यावर आता वेस्टर्न सेक्टरची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतात आल्यानंतर अभिनंदन केव्हा सेवेत रूजू होणार याची प्रतिक्षा तमाम भारतीयांना होती. पण, त्यांची ही प्रतिक्षा आता संपली आहे.
Indian Air Force transfers Wing Commander Abhinandan Varthaman out of the Srinagar airbase amid concerns over his security in Kashmir valley. Officer posted to an important airbase in the Western sector. (File pic) pic.twitter.com/RWnlPfR4jV
14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी आत्मघातकी स्फोटाद्वारे पुलवामा येथे जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केलं. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतानं हल्ल्यानंतर बाराव्या दिवशी म्हणजेच 26 मार्च रोजी पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला. ज्यामध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. सध्या, दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण देखील आता निर्माण झालं आहे.
प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल