पुलवामा हल्ल्यानंतर गुजरात अलर्ट मोडवर; गुप्तचर विभागाने दिला इशारा

पुलवामा हल्ल्यानंतर गुजरात अलर्ट मोडवर; गुप्तचर विभागाने दिला इशारा

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्तचर विभागाने गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 18 फेब्रुवारी: जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्तचर विभागाने गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासंदर्भात गुजरात पोलिसांना माहिती देण्यात आली असून राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान ठार झाले होते.

वाचा- Pulwama : 'ऑपरेशन बदला', रात्री 1 ते दहशतवादी लपलेलं घर उडवेपर्यंत...सगळा घटनाक्रम

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. यात प्रमुख रेल्वे स्थानक, गुजरातची किनारपट्टी, स्टेच्यू ऑफ युनिटी, धार्मिक स्थळ आणि चित्रपटगृहांचा समावेश आहे. राज्य पोलिस दलाने या सर्व ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दहशतवादी गुजरातमध्ये असून त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर गुप्तचर विभागाने गुजरातसह देशातील अन्य मुख्य शहरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. काश्मीरनंतर दहशतवादी दिल्ली आणि उत्तर प्रदेशकडे येण्याची शक्यता आहे. दहशतवादी उत्तर प्रदेशमधून शस्त्र विकत घेऊ शकतात. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधून शस्त्रसाठा घेऊन काश्मीरला जाणाऱ्या काही जणांना दिल्लीत अटक करण्यात आली होती.

पुलवामा हल्ल्या आधी दिला होता अलर्ट

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याआधी काश्मीर पोलिसांना 8 फेब्रुवारी रोजी अलर्ट देण्यात आला होता. पोलिस दलाने याची माहिती CRPF, BSF, ITBP, SSB या सर्वांनी दिली होती. तसेच भारतीय लष्कर आणि हवाई दलाला देखील याची माहिती देण्यात आली होती. या अलर्टमध्ये दहशतवादी सुरक्षा दलावर राष्ट्रीय महामार्गावर हल्ला करु शकतात असे म्हटले होते. इतकच नव्हे तर हा हल्ला आयईडीद्वारे केला जाऊ शकतो असे देखील गुप्तचर विभागाने म्हटले होते.

Pulwama Encounter: भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना घेरले, ग्राऊंडवरून पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 12:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading