पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या घोषणेचा चीनला दणका, 5 महिन्यातच दिसून आले परिणाम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या घोषणेचा चीनला दणका, 5 महिन्यातच दिसून आले परिणाम

भारताची काही क्षेत्रातली चीनला होणारी निर्यात वाढली आहे. भारताची पोलाद निर्यात तब्बल 8 पट वाढली आहे. त्यामुळेही व्यापार तूट कमी होण्यास फायदा झाला.

  • Share this:

मुंबई 09 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिलेल्या आत्मनिर्भर (Atmanirbhar Bharat ) घोषणेचे आता परिणाम दिसून येत आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये भारत आणि चीनमध्ये असलेली व्यापर तूट तब्बल 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. चीनला होणारी भारताची निर्यात वाढली असून आयातीचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे व्यापार तूट घटल्याचं सांगितलं जात आहे. हा चीनला मोठा दणका मानला जात आहे.

भारत आणि चीन सीमेवर असलेला तणाव आणि कोरोनाची महाभयंकर साथ या पार्श्वभीमीवर पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा दिली होती. त्यानंतर भारताने चीनच्या Appsवर बंदी घातली. आयात होणाऱ्या चिनी मालावर डंम्पिंग ड्युटी लावली त्यामुळे आयात घटली आहे. भारतात चीन विरोधी वातावरण असल्याने व्यापाऱ्यांनी मालही आयात केला नाही.

याउलट भारताची काही क्षेत्रातली चीनला होणारी निर्यात वाढली आहे. भारताची पोलाद निर्यात तब्बल 8 पट वाढली आहे. त्यामुळेही व्यापार तूट कमी होण्यास फायदा झाला.

बिझनेस स्टँडर्डने यासंदर्भात आकडेवारी दिली आहे. 2020च्या एप्रिल ते ऑगस्ट दरम्यानची व्यापार तूट ही 12.6 अब्ज डॉलर्स (93 हजार कोटी) एवढी होती. 2019-20मध्ये याच काळात ही तूट तब्बल 22.6 अब्ज डॉलर्स एवढी होती. याच काळीत निर्यात ही 27 टक्क्यांनी वाढली आहे. आधीच्या वर्षात ही याच काळात निर्यात 9.5 टक्क्यांनी वाढली होती.

चीन आणि पाकिस्तानला ‘राफेल’चा धाक, अमेरिकाही भारताच्या मदतीला येणार

दरम्यान, भारत आणि चीनदरम्यानचा सीमेवरचा तणाव अजुनही कायम आहे. लष्करी आणि मंत्रिस्तरावर चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पहिल्यांदाच एका परिषदेत सहभागी होणार आहेत. 17 नोव्हेंबरला BRICS राष्ट्रांची बैठक होणार असून त्यात सर्व देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांदरम्यानचा तणाव वाढल्यानंतर पहिल्यांदाच हे नेते आमने-सामने येणार असल्याने सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडे लागणार आहे.

भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे या संघटनेचे सदस्य देश आहेत. 2006मध्ये या संघटनेची स्थापना झाली होती.

युद्धाची वेळ आलीच तर चीनला धडा शिकवणार , लष्कराचा Action Plan तयार!

दरम्यान, भारत (India) आणि चीन (China)च्या सीमेवर अजुनही तणाव आहे. चीनने पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याचं स्पष्ट आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 'राफेल' या अत्याधुनिक विमानांचा समावेश झाल्याने भारताची स्थिती मजबूत झाली आहे. याचा धसका पाकिस्तान आणि चीनने घेतल्याचं सुरक्षा तज्ज्ञांचं मत आहे. या तणावात अमेरिकाही भारताच्या बाजूने असून आणीबाणीच्या प्रसंगात भारताला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करण्याची शक्यताही संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 9, 2020, 5:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading