लडाख, 20 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीनंतर चीननं मोठा दावा केला आहे. गलवत खोरं हा आमचाच भाग असून भारतीय सैन्यानं सीमारेषा पार केल्याचा दावा चीननं केला आहे. अनेक वर्षांपासून चीनचे सैनिक या भागात गस्त घातल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर भारतीची कुठलीही पोस्ट चीननं बळकावली नाही असा सर्वात मोठा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत खुलासा केला आहे.
चीनचं लष्कर भारतीय हद्दीत घुसलं आहे. त्यांनी काही भारताच्या पोस्ट बळकावल्या आहेत असे आरोप होत होते. त्या सर्व आरोपांना पंतप्रधानांनी उत्तर सर्वपक्षीय बैठकीत उत्तर दिलं. त्यानंतर काही तासांतच चीनच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत. चीनी परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी आपल्या संकेतस्थळावर एक प्रेस नोट जारी केली असून दावा केला आहे की गलवान खोऱ्याची वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) चीनी बाजूने आहे. त्यामुळे भारतीय सैनिकांनी ती पार केल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे.
हे वाचा-
मोदींचं मोठं वक्तव्य : 'आपल्या सीमेत कोणीही घुसखोरी केलेली नाही'
भारताची एक इंच जमीन बळाविण्याचं धाडस कुणी करू शकत नाही देशाचं संरक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण मोकळीक देण्यात आल्याचही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत सांगितलं.
15 जून रोजी संध्याकाळी भारताच्या जवानांनी झालेला करार तोडून सीमारेषा पार केली. त्यामुळे संघर्ष झाला आणि त्यातून हिंसा. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले तर चीनच्याही अनेक सैनिकांचा हिंसेत मृत्यू झाला. त्यामुळे गलवान खोऱ्यात तणावाचं वातावरण होतं. आता चीननं केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे वाचा-
उद्धव ठाकरे म्हणाले, भारत मजबूत आहे, मजबूर नाही; डोळे काढून हातात देऊ
हे वाचा-
चीन वाद: सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींवर केला हा थेट आरोप, मागितलं आश्वासन
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.