पाकिस्तानी लष्करच करतंय दहशतवाद्यांना मदत, भारताच्या हाती पुरावा

पाकिस्तानी लष्करच करतंय दहशतवाद्यांना मदत, भारताच्या हाती पुरावा

पाकिस्तान दहशतवाद्यांना भारताविरोधात कारवाईसाठी पाठिंबा देत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

  • Share this:

श्रीनगर, 30 मार्च : आम्ही दहशतवाद्यांना थारा देणार नाही अशी वल्गना करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा जगासमोर फाटला आहे. कारण शुक्रवारी लष्करानं केलेल्या कारवाईमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. ठार झालेला दहशतवादी हा पाकिस्तानचा नागरिक असून त्याच्याकडे आता अमेरिकन बनावटीची M4 रायफल सापडली आहे. दरम्यान, ही रायफल पाकिस्तानी लष्कराच्या वापरात आहे. बडगाम जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी ठार झालेल्या दहशतवाद्याकडे M4 रायफल सापडली आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. मागील सहा महिन्यामध्ये दुसऱ्यांदा M4 रायफल दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट होत आहे.

31 ऑक्टोबर 2017मध्ये मसूद अझहरचा पुतण्या इस्मान हैदरचा खात्मा लष्करानं केला होता. त्यावेळी देखील M4 रायफल ताब्यात घेण्यात आली होती.


जम्मू हायवेवर सुरक्षा दलाच्या ताफ्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट; सर्व जवान सुरक्षित


टॉपचे कमांडर ठार

पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्करानं मोहिम उघडली आहे. मागील 24 तासांत टॉपच्या सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती 'हिंदुस्तान टाईम्स'नं दिली आहे.


भारताविरोधात F-16चा वापर

दरम्यान, भारतानं एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्ताननं देखील अमेरिकेसोबत झालेल्या कराराचं उल्लंघन करत F-16 विमानांचा भारताविरोधात केला होता. पैकी एक विमान देखील भारतानं पाडलं होतं. पाकिस्तानच्या या कारवाईमुळे अमेरिका देखील पाकिस्तानवर नाराज झाली आहे. त्यानंतर आता थेट अमेरिकन बनावटीची M4 रायफल दहशतवाद्यांकडे सापडल्यानं पाकिस्तानच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.


'तर माझ्या जीवनात शुन्य बाकी उरेल...', अमित शहांचं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 01:46 PM IST

ताज्या बातम्या