Home /News /national /

Omicron नंतर पुन्हा येणार कोविड-19 चा संसर्ग, पण...; अभ्यासात झाला मोठा खुलासा

Omicron नंतर पुन्हा येणार कोविड-19 चा संसर्ग, पण...; अभ्यासात झाला मोठा खुलासा

Corona Virus News Updates: कोरोना संसर्गासंदर्भात (Corona Infection) एका अभ्यासात मोठा खुलासा झाला आहे.

    नवी दिल्ली, 22 जानेवारी: कोरोना संसर्गासंदर्भात (Corona Infection) एका अभ्यासात मोठा खुलासा झाला आहे. द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कोविड-19 महामारी लवकरच संपुष्टात येईल पण व्हायरसचा संसर्ग कायम राहू शकतो. अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, ओमायक्रॉन संसर्गानंतर कोविड-19 चा (Covid-19 Infection)संसर्ग पुन्हा एकदा येईल पण यावेळी महामारी होणार नाही. अभ्यासात असं म्हटलं आहे की, कोविड-19 पुन्हा एकदा लोकांना आजारी करेल आणि ते रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांना व्यवस्थापित करावं लागेल. मात्र डेल्टा व्हेरिएंटमध्ये किंवा कोरोनाच्या पहिल्या फेरीत संसर्ग टाळण्यासाठी ज्या पद्धतीने निर्बंध लागू केले जातात, यावेळी तसं काहीही करण्याची गरज लागणार नाही. ज्यामुळे सर्वांना दिलासा मिळेल. कमकुवत होईल व्हायरस आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं की, व्हायरसचा आतापर्यंतचा प्रभाव भविष्यात तो कमकुवत होणार असल्याचं दिसून येते. भविष्यात SARS-CoV-2 व्हायरसचा आरोग्यावरील परिणाम पूर्वीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी होईल. नवीन व्हेरिएंट नवीन अँटीव्हायरल आणि लोकांना व्हायरसपासून वाचवण्याचे ज्ञान या विरुद्ध लस आरोग्याच्या रक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असं तज्ज्ञांचं मत आहे. अँटीबॉडीज लसीचा तिसरा डोस वाढवतील अभ्यासात असंही म्हटलं आहे की, कोविड-19 लसीचा तिसरा डोस अँटीबॉडीजची पातळी वाढवतो ज्यामुळे कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट, ओमायक्रॉनच्या संसर्गास देखील निष्प्रभावी करता येते. फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्च (एनआयएचआर), यूकेच्या संशोधकांना असे आढळून आले की, ज्या लोकांना अॅस्ट्राझेनेका किंवा फायझर लसीचे फक्त दोन डोस मिळाले त्यांच्यामध्ये तयार केलेले अँटीबॉडी अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन कमी करण्यास सक्षम होते. तीन महिन्यांत प्रतिकारशक्ती कमकुवत झाली त्यांना असेही आढळले की, दुसऱ्या डोसनंतर पहिल्या तीन महिन्यांत अँटीबॉडीची पातळी कमी झाली. मात्र तिसऱ्या बूस्टर डोसने अँटीबॉडीची पातळी वाढवली. ज्यामुळे ओमायक्रॉन व्हेरिएंट प्रभावीपणे निष्प्रभावी झाला. ज्या लोकांना तिन्ही डोससाठी फायझर लस मिळाली होती. त्यांच्यामध्ये तिसर्‍या डोसनंतर ओमायक्रॉन विरूद्ध अँटीबॉडी पातळी होते, ज्यांना यापूर्वी डेल्टाविरूद्ध फक्त दोन शॉट्स मिळाले होते, असं अभ्यासात आढळून आलं. तीन डोसनंतर अँटीबॉडीजमध्ये वाढ संशोधकांच्या मते, ओमायक्रॉन विरुद्ध अँटीबॉडीजची पातळी दोन डोसनंतरच्या तुलनेत तीन डोसनंतर सुमारे 2.5 पट जास्त होती. ज्या लोकांमध्ये भूतकाळात कोणतीही लक्षणे नव्हती. त्यांच्या तुलनेत ज्यांना लसीचे दोन डोस मिळाले होते आणि ज्यांना यापूर्वी COVID-19 ची लक्षणे आढळून आली होती अशा लोकांमध्ये देखील ओमायक्रॉन विरूद्ध उच्च पातळीचे अँटीबॉडीज आढळून आले. एकट्या अँटीबॉडीची पातळी लसीच्या परिणामकारकतेचा अंदाज लावत नसली तरी, ते गंभीर COVID-19 विरूद्ध संरक्षणाचे एक चांगले संकेत आहेत, असे संशोधकांनी नमूद केलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या