Home /News /national /

गोडसेनंतर गांधींचा मारेकरी नारायण आपटेचीही बनवली मूर्ती; याठिकाणी केली जाणार स्थापना

गोडसेनंतर गांधींचा मारेकरी नारायण आपटेचीही बनवली मूर्ती; याठिकाणी केली जाणार स्थापना

हिंदू महासभेनं आता गांधींच्या हत्येतील दुसरा मुख्य आरोपी असणाऱ्या नारायण आपटेची देखील मूर्ती (Made Narayan Apte's idol) बनवली आहे.

    मेरठ, 12 सप्टेंबर: काही दिवसांपूर्वी हिंदू महासभा (Hindu Mahasabha) संघटनेनं राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma gandhi) यांचा मारेकरी असणाऱ्या नथुराम गोडसेची (Nathuram Godse) मूर्ती बनवली होती. या घटनेनंतर देशात बराच वादंग उठला होता. ही घटना ताजी असताना हिंदू महासभेनं आता गांधींच्या हत्येतील दुसरा मुख्य आरोपी असणाऱ्या नारायण आपटेची देखील मूर्ती (Made Narayan Apte's idol) बनवली आहे. लवकरच या मूर्तीची स्थापना केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उघड होताच पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. पोलिसांनी मेरठ येथील हिंदू महासभा भवनाला घेराव घातला आहे. पण नारायण आपटेची मूर्ती सध्या कुठे आहे, याबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती नाही. पण हिंदू महासभेच्या प्रत्येक हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील दौलतागंज याठिकाणी हिंदू महासभेची एक मोठी बैठक पार पडली होती. दरम्यान हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी महात्मा गांधीचा मारेकरी नारायण आपटे यांची मूर्ती तयार असल्याचं म्हटलं होतं. संधी मिळताच आपटेच्या मूर्तीची स्थापना केली जाईल, असंही त्यांनी बैठकीत म्हटलं होतं. संबंधित बैठकीत त्यांनी नारायण आपटेचा उल्लेख 'शहीद' असा केला होता. या बैठकीत हिंदू महासभेचे बरेच पदाधिकारी उपस्थित होते. हेही वाचा-भयंकर! सूर्यावर येणार सर्वात मोठं वादळ; शास्त्रज्ञांनी दिला 'हा' गंभीर इशारा दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार, 2 महिन्यांपूर्वी ग्वाल्हेर येथे नारायण आपटेच्या 2 फूट उंचीचा पुतळा बनवण्याचं काम सुरू केलं होतं. 45 हजार रुपयांत बनवलेल्या या मूर्तीचं काम 15 दिवसांपूर्वी पूर्ण झालं आहे. मेरठ येथील हिंदू महासभेच्या भवनात या मूर्तीची स्थापना करण्यासाठी ही मूर्ती ग्वाल्हेरवरून मेरठला पाठवण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनाही याची जराही खबर नव्हती. विशेष म्हणजे हिंदू महासभेनं यापूर्वीही नथुराम गोडसेचं मंदिर आणि ज्ञानशाळेची स्थापना केली होती. पण त्यानंतर प्रशासनानं कारवाई केली होती. हेही वाचा-भाजपला शह देण्यासाठी शिवसेना पोहोचली थेट उत्तर प्रदेशामध्ये, लढवणार निवडणूक नारायण आपटे नेमके कोण?   नारायण दत्तात्रय आपटे हा गांधी हत्येतील मुख्य आरोपी नथुराम गोडसेचा सहकारी होता. त्याला 15 नोव्हेंबर 1949 रोजी गोडसेसह अंबाला येथील कारागृहात फाशी देण्यात आली. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींच्या हत्येच्या वेळी नारायण आपटे हा नथुराम गोडसेच्या पाठीमागेच उभा होता. गांधींजीच्या हत्येप्रकरणात न्यायालयानं 10 फेब्रुवारी 1949 रोजी नथुराम गोडसेसह आपटेला फाशीची शिक्षा सुनावली होती. तर उर्वरित 6 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Madhya pradesh

    पुढील बातम्या