धक्कादायक! हत्येनंतर 18व्या मजल्यावरून खाली फेकला तरुणीचा मृतदेह, कारण...

सगळ्यात गंभीर म्हणजे आरोपीने रात्रभर युवतीचा मृतदेह फ्लॅटमध्येच ठेवला होता. त्यानंतर हत्येचा कोणाला संशय येऊ नये यासाठी युवतीचा मृतदेह खाली फेकला आणि...!

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 09:02 PM IST

ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश), 04 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. हत्येचा असाच एक खळबळजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. आरोपीने युवतीची हत्या केल्यानंतर ती आत्महत्या वाटावी यासाठी मृतदेहाला चक्क 18व्या मजल्यावरून खाली फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. युवतीला खाली फेकल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. यासगळ्या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवतीचा खून केल्यानंतर हत्येला आत्महत्या दाखवण्यासाठी मृतदेहाला 18व्या मजल्यावरून खाली फेकलं. सगळ्यात गंभीर म्हणजे आरोपीने रात्रभर युवतीचा मृतदेह फ्लॅटमध्येच ठेवला होता. त्यानंतर हत्येचा कोणाला संशय येऊ नये यासाठी युवतीचा मृतदेह खाली फेकला आणि तिथून पळ काढला. सकाळच्या सुमारास सुरक्षा कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर प्रकरणाचा उलगडा झाला.

इतर बातम्या - लग्नानंतर झालेल्या छळाला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या, जायकवाडी धरणात घेतली उडी

गेल्या दोन-तीन दिवसांआधीच आरोपी आणि युवती फ्लॅटवर राहण्यासाठी आले होते. त्यांच्या फ्लॅट शेजारी आरोपीचा भाऊ आणि वहिणीचा फ्लॅटही होता. आरोपीच्या भावाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. शनिवारी सकाळच्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडून सुमारास घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधी आरोपी फरार झाला होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

आरोपी आणि युवतीमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर आरोपीने रागात हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. वाद झाल्यानंतर आरोपीने युवतीची हत्या केली. याची कोणतीही माहिती शेजाऱी राहणाऱ्या भावाला नव्हती असं त्याने पोलीस चौकशीत सांगितलं आहे.

Loading...

इतर बातम्या - दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक, तिघा मित्रांचा जागीच मृत्यू

आरोपीचा भाऊ आणि वहिणी बाजूच्या फ्लॅटमध्ये राहत होते. त्यामुळे आरोपी आणि मृत युवतीमध्ये नेमकं काय झालं होतं. त्यांच्यात काय नातं होतं. आणि गेल्या काही दिवसांपासून मृत युवती आरोपीसोबत का राहत होती याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

इतर बातम्या - पतीनंतर प्रियकरानेही साथ सोडली, आता फोटोसोबत 'ती' घेणार सप्तपदी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 08:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...