मराठी बातम्या /बातम्या /देश /लग्नानंतर पत्नीच्या क्रूरतेमुळे पतीचं 21 किलो वजन घटलं; हायकोर्टाने घटस्फोटाला दिली परवानगी

लग्नानंतर पत्नीच्या क्रूरतेमुळे पतीचं 21 किलो वजन घटलं; हायकोर्टाने घटस्फोटाला दिली परवानगी

पत्नीच्या छळामुळे घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण त्या तुलनेत खूपच अल्प आहे; मात्र दरवेळी पतीच दोषी असतो असं नाही तर पत्नीच्या छळामुळे पतीवरही घटस्फोट घेण्याची वेळ येते.

पत्नीच्या छळामुळे घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण त्या तुलनेत खूपच अल्प आहे; मात्र दरवेळी पतीच दोषी असतो असं नाही तर पत्नीच्या छळामुळे पतीवरही घटस्फोट घेण्याची वेळ येते.

पत्नीच्या छळामुळे घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण त्या तुलनेत खूपच अल्प आहे; मात्र दरवेळी पतीच दोषी असतो असं नाही तर पत्नीच्या छळामुळे पतीवरही घटस्फोट घेण्याची वेळ येते.

    हरियाणा, 9 सप्टेंबर : आजकाल पती-पत्नीनं घटस्फोट (Divorce) घेणं ही अगदी सहज बाब झालेली आहे. बहुतांश वेळा पतीच्या त्रासामुळे किंवा हुंड्यासाठी (Dowery) सासरी छळ होत असल्यानं महिला घटस्फोट घेताना दिसतात. पत्नीच्या छळामुळे घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण त्या तुलनेत खूपच अल्प आहे; मात्र दरवेळी पतीच दोषी असतो असं नाही तर पत्नीच्या छळामुळे पतीवरही घटस्फोट घेण्याची वेळ येते. हरियाणातील (Haryana) हिसारमधील (Hisar) एका पतीनं (Husband) तर लग्नानंतर पत्नीनं केलेल्या मानसिक छळामुळे आपलं वजन (Weight) 21 किलो कमी झाल्याचं सांगत न्यायालयाकडे घटस्फोटाची परवानगी मागितली. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयानं (High Court) पिडीत पतीला मागणी मंजूर करत त्याला दिलासा दिला आहे.

    लाइव्ह हिंदुस्थान डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, बँक कर्मचारी (Bank Employee) असलेल्या या पुरुषाचे हिस्सार इथल्या खासगी शाळेत शिक्षिका (Teacher) असलेल्या महिलेशी एप्रिल 2012मध्ये लग्न झालं. या व्यक्तीला कानाने कमी (Hearing Disability) ऐकायला येतं. या जोडप्याला एक मुलगी (Daughter) असून ती या व्यक्तीसोबत म्हणजे आपल्या वडिलांसोबत म्हणजे राहते.

    पत्नी (Wife) तापट (Angry) स्वभावाची आणि उधळपट्टी करणारी असल्यानं या दोघांमध्ये वाद होत होते. पत्नीनं कधीही कुटुंबात रममाण होण्याचा प्रयत्न केला नाही. क्षुल्लक गोष्टींवरून ती भांडत असे. आई-वडील आणि नातेवाईक यांच्यासमोर त्याचा अपमान करत असे, तरीही कालांतराने तिचा स्वभाव बदलेल या अपेक्षेनं या पतीनं सर्व सहन केलं, मात्र पत्नीच्या वागण्यात सुधारणा झाली नाही. पत्नीच्या अशा वागण्यानं पतीचे मानसिक स्वास्थ हरवलं आणि त्याच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ लागला. त्यामुळं त्याचं लग्नावेळी 74 किलो असणारे वजन नंतर 53 किलोवर आलं. या सगळ्या जाचाला कंटाळून पतीने अखेर हिस्सार कौटुंबिक न्यायालयात (Hisar Family Court) घटस्फोटासाठी अर्ज केला. न्यायालयानं तो मंजूरही केला; पण पत्नीनं हिस्सारच्या कौटुंबिक न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत, हिसार कौटुंबिक न्यायालयाच्या आदेश रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली.

    हे ही वाचा-वेगवेगळ्या पुरुषांसह 25 वेळेस घरातून पळाली महिला; मात्र तरीही पती लावतो जीव

    पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या (Punjab and Haryana High Court) न्यायमूर्ती रितू बाहरी आणि न्यायमूर्ती अर्चना पुरी यांच्या खंडपीठासमोर (Bench) ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी पत्नीनं नेहमीच आपण आपलं वैवाहिक कर्तव्य प्रेम आणि आदरानं पार पाडल्याचा दावा केला. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला हुंड्यासाठी त्रास द्यायला सुरुवात केली होती, असंही तिनं सांगितलं. मात्र या महिलेनं तिचा पती आणि त्याच्या कुटुंबाविरोधात दाखल केलेल्या सर्व गुन्हेगारी तक्रारी खोट्या असल्याचं न्यायालयाला आढळून आलं. पतीच्या कुटुंबानं कधीही हुंडा मागितला नाही, तर उलट लग्नानंतर महिलेच्या उच्च शिक्षणासाठी पैसे दिले असल्याचं स्पष्ट झालं. तसंच ही महिला 2016 पासून पतीपासून वेगळी राहत होती. तिनं आपल्या मुलीलाही सासरीच सोडलं होतं आणि तिला कधी भेटण्याचा प्रयत्नही केला नव्हता, हेही न्यायालयासमोर स्पष्ट झालं.

    त्यामुळं उच्च न्यायालयानं हिस्सार कौटुंबिक न्यायालयानं पीडित पतीच्या घटस्फोटाच्या मागणीला दिलेली परवानगी कायम ठेवत, पत्नीची घटस्फोटाचा आदेश रद्द करण्याची याचिका फेटाळली.

    पत्नीच्या मानसिक छळामुळे पतीला वजन कमी होण्याच्या कारणावरून घटस्फोट मिळण्याची ही पहिलीच केस असावी. मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित पतीला दिलासा मिळाला आहे.

    First published:

    Tags: Court, Divorce