पराभवानंतर काँग्रेसमध्ये 'कॉस्ट कटिंग', नोकऱ्याही गेल्या, पगारालाही विलंब

पराभवानंतर काँग्रेसमध्ये 'कॉस्ट कटिंग', नोकऱ्याही गेल्या, पगारालाही विलंब

आता काही महिन्यांमध्येच विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यात प्रचासाराठी पैसे कुठून आणायचे या चिंतेत काँग्रेसचे नेते आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 12 जुलै : लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत नसल्याने पक्षाचे आर्थिक स्रोत आटले आहेत. तर लोकसभेतल्या पराभवानंतर ते आणखी कमी झालेत. त्यामुळे पक्षाला पैशांची तीव्र चणचण जाणवू लगालीय. त्याचा पहिला फटका काँग्रेससाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसलाय. यातल्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात तर गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगारच झालेले नाहीत. अनेक विभागांनाही खर्चात बचत करायला सांगण्यात आलंय.

गेली 50 ते 60 वर्ष सत्ता भोगल्यानंतर काँग्रेस गेल्या पाच वर्षांपासून सत्तेच्या बाहेर आहे. मोजकी राज्य सोडलीत तर सगळीकडे भाजपचीच राज्य सरकारं आहेत. त्यामुळे पक्षाला मिळणारी आर्थिक रसद जवळपास बंदच झालीय. लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसने सोशल मीडिया आणि Data Analyticsसाठी मोठी टीम तयार केली होती. त्यावर प्रचंड खर्च केला होता.

तुम्ही रद्द केलेल्या तिकिटांमुळे रेल्वेचा भरला खजिना, मिळाले 1,518.62 कोटी

मात्र दारुण पराभव झाल्यानंतर या विभागांचं खरं रुप बाहेर आलं. राहुल गांधी यांच्यासमोर जे चित्र रंगविण्यात आलं होतं ते बनावट असल्याची माहिती बाहेर आलीय. त्यामुळे कॉस्ट कटिंगमध्ये पहिला घाव याच विभागांवर पडलाय. Data Analytics विभाग हा तात्पुरता बंदच करण्यात आलाय. सोशल मीडियात पूर्वी 50 ते 55 जण काम करत होते. आता फक्त 30 लोकांनाच ठेवण्यात आलंय.

अनेकांना दुसरी नोकरी शोधण्यास सांगण्यात आलंय. गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगारच झालेले नाहीत. सोवादलासहीत सर्वच विभागांना खर्च कमी करण्यास सांगण्यात आलंय. सेवादलाला दर महिन्याला अडीच लाख रुपये खर्चासाठी मिळत होते ते आता दोन लाख करण्यात आले आहेत.

आता काही महिन्यांमध्येच विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यात प्रचासाराठी पैसे कुठून आणायचे या चिंतेत काँग्रेसचे नेते आहेत.

VIDEO : चालत्या रेल्वेतून पडणारी महिला अशी बचावली !

राहुल गांधींचे वकील म्हणाले, '15 हजार रुपयांत जामीन देऊन टाका.'

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या कोर्टात हजेरी लावत आहेत. अहमदाबादमधल्या एका मानहानीच्या खटल्यात कोर्टाने राहुल गांधींना 50 हजार रुपयांच्या जामिनाचा आदेश दिला. त्यावर प्लीज, 15 हजार रुपयांत करा, असं त्यांचे वकील म्हणाले. कोर्टाने राहुल गांधींना विचारलं, तुम्ही दोषी आहात का ? त्यावर राहुल गांधींनी उत्तर दिलं, नाही, 'मी दोषी नाही.'

कोर्ट म्हणालं, तुम्ही स्वत:चा बचाव करू इच्छिता का? त्यावर राहुल गांधी उत्तरले, हो. मी माझा बचाव करू इच्छितो. राहुल गांधींनी त्यानंतर त्यांची कागदपत्रं पाहण्यासाठी हात पुढे केले. त्यांनी त्यांच्या पत्त्यामधलं तुघलक रोड आणि पार्लमेंट या दोन शब्दांचं स्पेलिंग चुकल्याचं सांगितलं. त्यावर कोर्टाने ही स्पेलिंग दुरुस्त करण्याचा आदेश दिला.

लद्दाख भागात चीनची घुसखोरी, साध्या वेषात आले होते सैनिक

50 हजार नाही... 15 हजार

या खटल्यात राहुल गांधींना जामीन मिळू शकतो, असं कोर्टाने सांगितलं. कोर्टाने पहिल्यांदा त्यांना 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. त्यावर राहुल गांधींच्या वकिलांनी, हा जामीन 15 हजार रुपये करा, अशी विनंती केली. कोर्टाने ती मान्य केली आणि अशा रितीने जामिनाचे 35 हजार रुपये वाचले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 09:18 PM IST

ताज्या बातम्या