लोकसभेच्या निकालाआधी 'या' मतदारसंघात पोटनिवडणुकीची तयारी!

लोकसभेच्या निकालाआधी 'या' मतदारसंघात पोटनिवडणुकीची तयारी!

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वजण प्रतिक्षा करत असताना उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.

  • Share this:

लखनऊ, 22 मे: लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वजण प्रतिक्षा करत असताना उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. राज्यातील भाजपचे काही आमदार आणि मंत्री लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निकालाआधी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार पुढील सहा महिन्यात राज्यात पोट निवडणुका होण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे 4 मंत्री आणि 3 आमदार लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. योगींच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री सत्यदेव पचौरी कानपूरमधून, रिटा बहुगुणा जोशी अलाहाबाद येथून, आगरा येथून एस.पी.सिंग बघेल, आंबेडकरनगर मतदारसंघातून मुकुट बिहारी वर्मा हे निवडणूक लढवत आहेत. याशिवाय आमदार असलेले उपेंद्र रावत, राम कुमार पटेल आणि संगम लाल गुप्ता लोकसभेच्या रिंगणात आहेत. निवडणुकीचा निकाल जर या उमेदवारांच्या बाजूने लागला तर आयोगाला 6 महिन्याच्या आत पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष त्या दृष्टीने तयारीला लागला आहे.

अमेठीचा निकाल ठरवेल पोटनिवडणुकीचा कौल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी दोन मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. उत्तर प्रदेशमधील अमेठी सोबतच केरळमधील वायनाड येथून देखील ते निवडणूक लढवत आहेत. अमेठीचा निकाल आणि त्यानंतर ते कोणची जागा सोडणार यावर लोकसभेची पोटनिवडणूक कोठे होणार हे निश्चित करेल. काँग्रेसमधील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींनी जर दोन्ही जागा जिंकल्या तर ते वायनाडची जागा कायम ठेवतील आणि अमेठीची जागा सोडतील. असे झाले तर अमेठीतून पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी पोट निवडणूक लढवतील.

मंत्रिमंडळात होणार बदल

भाजपने राज्य सरकारमधील चार कॅबिनेट मंत्री लोकसभेसाठी उभे केले आहेत. योगीचे मंत्री विजयी झाले तर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. अशा परिस्थितीत राज्य मंत्रिमंडळात बदल करावे लागतील. लोकसभेसाठी उभे राहिलेले पचौरी लधु उद्योग मंत्री, बहुगुणा जोशी यांच्याकडे महिला कल्याण मंत्रालय, बघेल यांच्याकडे मत्स्य तर वर्मा यांच्याकडे सहकार मंत्रालय आहे.

SPECIAL REPORT : उत्तर प्रदेशमध्ये 'हाती-सायकल' पडणार कमळावर भारी?

First published: May 22, 2019, 8:48 AM IST

ताज्या बातम्या