मराठी बातम्या /बातम्या /देश /

आता या राज्यातही लव्ह जिहादविरोधात कडक नियम! 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासासह लाखोंच्या दंडाची शिक्षा

आता या राज्यातही लव्ह जिहादविरोधात कडक नियम! 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासासह लाखोंच्या दंडाची शिक्षा

Love Jihad Act: नवीन 'लव्ह जिहाद' कायद्यानुसार, जर महिलांचं जबरदस्तीने धर्मांतर केलं, तर संबंधित आरोपीला दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तसंच धर्मांतर झालेली मुलगी अल्पवयीन असेल तर आणखी गंभीर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
    गांधीनगर, 31 मार्च: भारतातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा (Anti Love Jihad Act) लागू केल्यानंतर आता गुजरातनेही लव्ह जिहाद कायदा आणण्याची तयारी केली आहे. गुजरातमध्ये (Gujarat) भारतीय जनता पक्षाच्या सरकारने (BJP Government) 'गुजरात धार्मिक स्वातंत्र्यता अधिनियम 2003' मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या कायद्यांतर्गत विवाहाद्वारे जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांविरोधात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या नवीन कायद्यानुसार 3 ते 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. विधानसभेत हा ठराव मंजूर झाल्यानंतर गुजरातमध्येही लव्ह जिहादविरोधी कठोर कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल. संबंधित विधेयक मंगळवारी गुजरात विधानसभेत मांडण्यात येणार आहे. नवीन 'लव्ह जिहाद' कायद्यानुसार, जर महिलांचं जबरदस्तीने धर्मांतर केलं, तर संबंधित आरोपीला पाच वर्षांचा तुरूंगवास आणि दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसंच अल्पवयीन मुलीचं धर्मांतर केल्यास सात वर्षांचा तुरूंगवास आणि 3 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे येथून पुढे लग्नानंतर एखद्या महिलेचं जबरदस्तीने धर्मांतर करणं खूप महागात पडू शकतं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलं जाणार विधेयक या कायद्यांतर्गत, एससी आणि एसटी समुदायातील महिलांच्या धर्मांतरासाठीही सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. गुजरात विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात 'लव्ह जिहाद' किंवा सक्तीने होणाऱ्या धर्मांतरणांना सामोरं जाण्यासाठी काही बदल केले जाणार आहेत. तसंच 'फ्रीडम ऑफ रिलिजन बिल 2021' मध्ये एक दुरुस्ती केली जाणार आहे. (वाचा - उत्तर प्रदेशनंतर 'या' राज्यात Love Jihad विरोधी कायद्याला मान्यता, पंडित-मौलवी दोघांनाही होणार शिक्षा) गुजरातमध्ये धार्मिक स्वातंत्र्यता कायदा पहिल्यांदा 2003 लागू करण्यात आला. त्यानंतर 2006 मध्ये पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली. धर्मिक स्वातंत्र्यता विधेयक 2021 आणण्यामागील गुजरात सरकारचं उद्दीष्टं, कायद्याची व्याप्ती वाढवणं असून विवाहाद्वारे होणाऱ्या धर्मपरिवर्तनाला चाप बसवणं हा आहे. लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडनंतर गुजरात हे भारतातील चौथं राज्य ठरणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BJP, Gujrat, Love, Love jihad, Modi government

    पुढील बातम्या