'आधी राहतं घर माझ्या नावे करा...' पतीच्या मृत्यूनंतर 4 दिवसानंतरही पत्नीचा अंतिम संस्कारास नकार

पतीवर अंतिम संस्कार करण्यासाठी महिलेने एक अट ठेवली. प्रशासनाकडून तिचं राहतं घर तिच्या नावावर करून द्यावं असं महिलेचं म्हणणं आहे.

पतीवर अंतिम संस्कार करण्यासाठी महिलेने एक अट ठेवली. प्रशासनाकडून तिचं राहतं घर तिच्या नावावर करून द्यावं असं महिलेचं म्हणणं आहे.

  • Share this:
    सिद्धार्थनगर, 19 नोव्हेंबर : उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर येथे एका महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर, 4 दिवसांनंतरही तिने अंतिम संस्कार नकार दिल्याची घटना समोर आली आहे. अंतिम संस्कार करण्यासाठी महिलेने एक अट ठेवली. प्रशासनाकडून तिचं राहतं घर तिच्या नावावर करून द्यावं असं महिलेचं म्हणणं आहे. मात्र, 4 वर्षांपूर्वी त्या महिलेच्या पतीने त्यांचं राहतं घरं विकलं. सध्या त्या घराचं प्रकरण कोर्टात आहे. मात्र आता पतीच्या मृत्यूनंतर हे घर आपल्या नावे करण्यासाठी, महिलेने पतीच्या अंतिम संस्कारास गेल्या चार दिवसांपासून नकार दिला आहे. चार दिवसांपासून मृतदेहावर अंतिम संस्कार न झाल्याने, संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका पाहाता, पोलीस आणि प्रशासकिय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन त्या कुटुंबियांना समजावलं. समाजातील इतर लोकांकडूनही मृत व्यक्तीच्या पत्नीला समजावण्यात आलं. परंतु ते कुटुंबिय कोणाचंही ऐकण्यास तयार नाही. यादरम्यान पोलिसांनी कुटुंबातील एकाला मारहाण केल्याचा आरोप त्या कुटुंबियांनी केला आहे. अखेर मृत व्यक्तीच्या लहान भावाने अंतिम संस्कार पार पाडले. (वाचा - 'डायन' म्हणत महिलेला केली मारहाण; बाजारात निर्वस्त्र केल्याचा आरोप) गजेंद्र प्रसाद नावाच्या व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने आपला मुलगा गुजरातहून परत येईपर्यंत अंतिम संस्कार केले नाहीत. मंगळवारी रात्री मुलगा आल्यानंतरही, अधिकाऱ्यांना अंतिम संस्कार न झाल्याची माहिती मिळाली. यावेळी चौकशीदरम्यान, गजेंद्र यांची पत्नी अंजू आणि मुलीने सांगितलं की, जोपर्यंत घर त्यांच्या नावे होत नाही, तोपर्यंत अंतिम संस्कार करणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गजेंद्र यांनी 2016 मध्ये घराची विक्री केली. परंतु गजेंद्र यांच्या पत्नीची मानसिक स्थिती खराब झाल्याचं सांगत, याप्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली, ज्यावर सध्या स्टे आहे. घरावर मृत व्यक्तीच्या कुटुंबियांचा कब्जा आहे. त्यामुळे आता पतीच्या मृत्यूनंतर ते घर प्रशासनाने आपल्या नावे करून द्यावं, अशी अट त्या महिलेल्या घातली होती. मात्र आता मृत व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्यात आले असून घरासंबंधी प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे, कोर्टाच्या निर्णयानुसार पुढील कायदेशीर कारावाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published: