Home /News /national /

जिद्दीला सलाम! हृदय प्रत्यारोपण केलेल्या मुलीनं बारावीत मिळवलं दमदार यश

जिद्दीला सलाम! हृदय प्रत्यारोपण केलेल्या मुलीनं बारावीत मिळवलं दमदार यश

जिद्दीला सलाम! हृदय प्रत्यारोपण केलेल्या मुलीनं बारावीत मिळवलं दमदार यश

जिद्दीला सलाम! हृदय प्रत्यारोपण केलेल्या मुलीनं बारावीत मिळवलं दमदार यश

केरळ राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिथल्या एका मुलीच्या दमदार यशाची सध्या चर्चा होतेय.

    कोळिकोडे, 24 जून : केरळ राज्यातले (Kerala Plus 2 Results) प्लस टू अर्थात 12वीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. फिनू शेरिन (Finu Sherin) नावाच्या मुलीला केमिस्ट्री वगळता अन्य नऊ विषयांत A+ ग्रेड मिळाली. एवढीच माहिती वाचली, तर त्यात फार काही विशेष वाटणार नाही. कारण A+ ग्रेड मिळणारे खूप विद्यार्थी असतात; पण या मुलीची गोष्ट वेगळी आहे. रिझल्ट जाहीर झाल्या झाल्या ती विष्णूच्या घरी गेली. हा विष्णू म्हणजे तोच तरुण, ज्याचं हृदय गेली चार वर्षं तिच्या शरीरात धडधडतं आहे. तो हे जग सोडून गेला असला, तरी त्याच्यामुळे तिला नवं जीवन मिळालं आहे. त्या नव्या जीवनात तिने मिळवलेलं हे यश साजरं करण्यासाठी ती विष्णूच्या कुटुंबीयांना भेटायला गेली होती. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. के. पी. सिद्दिकी हे फिनूच्या वडिलांचं नाव. ते एक ऑटोरिक्षा ड्रायव्हर आहेत. फिनूची कौटुंबिक आर्थिक पार्श्वभूमी समजण्यासाठी एवढी माहिती पुरेशी असावी. हे कुटुंब चक्कलक्कलमध्ये (Chakkalakkal) राहतं. फिनू नववीत असताना शाळेत एकदा तिला अचानक खूप थकल्यासारखं वाटायला लागलं. तपासणीनंतर तिला हृदयरोग (Heart Ailment) असल्याचं निष्पन्न झालं. कोळिकोडे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथल्या कार्डिऑलॉजिस्ट्सनी सुरुवातीला पेसमेकर बसवण्याची (Pacemaker) शिफारस केली; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर डॉक्टर्सच्या असं लक्षात आलं, की फिनूचं हृदय कायमस्वरूपी निकामी झालं आहे. त्यावर हृदय प्रत्यारोपण (Heart Implant) हाच एकमेव उपाय आहे. हेही वाचा - राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड! कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, पाहा Video फिनूच्या कुटुंबाला हा सर्वार्थाने मोठा धक्का होता. या शस्त्रक्रियेसाठी तब्बल 56 लाख रुपये लागणार होते; पण चक्कलक्कलमधले ग्रामस्थ पुढे आले. त्यांनी एक समिती स्थापन केली आणि सामाजिक कार्यकर्ते सलीम मदवूर यांना त्याच्या अध्यक्षपदी नेमलं. चक्कलक्कल HSS या फिनूच्या शाळेनेच तब्बल 13 लाख रुपयांची देणगी दिली. सलीम यांनी सांगितलं, 'फिनूच्या वडिलांनी त्यांची व्यथा माझ्याकडे मांडली, तेव्हा आम्ही तिला मदत करायचं ठरवलं. सारा समाज त्यासाठी पुढे आला. त्यासाठी सर्वांत कळीचा मुद्दा होता, तो म्हणजे 14 वर्षांच्या मुलीला साजेसं होईल असं हृदय मिळणं. त्यासाठी बेंगळुरूचं नारायण हृदयालय आणि कोळिकोडेमधलं मेट्रोमेड इंटरनॅशनल कार्डिअ‍ॅक सेंटर या दोन ठिकाणी फिनूचं नाव हृदयदात्याच्या शोधासाठी वेटिंग लिस्टमध्ये होतं. अखेर 23 वर्षांच्या विष्णूचं हृदय तिच्यासाठी उपलब्ध झालं.' कोळिकोडेमधल्या मायनाडमध्ये (Mayanad) राहणाऱ्या विष्णूचं 2018मध्ये मोटरसायकल अपघातात निधन झालं. तो नियमित रक्तदाता होता. त्याचा हा मदतीचा वारसा त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनीही सुरू ठेवायचा निर्णय घेतला. विशाल हृदयाच्या त्याच्या कुटुंबीयांनी दुःखाच्या प्रसंगी डगमगून न जाता त्याचं अवयवदान (Organ Donation) करायचं ठरवल्यामुळे एकूण सहा जणांचे प्राण वाचले आणि त्यांना नवं जीवन मिळालं. त्यापैकी फिनूला त्याचं हृदय मिळालं. हेही वाचा - EXCLUSIVE: 4 वर्षं सतत मूल्यांकन करून अग्निवीरांची कायमस्वरूपी सैनिक म्हणून निवड करण्याबाबत विचार होईल –जनरल बीएस राजू मेट्रोमेड हॉस्पिटलमध्ये फिनूवर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या सगळ्यात तिच्या शिक्षणात दोन वर्षं खंड पडला; पण तिने त्याच शाळेतून शिक्षण पुन्हा सुरू केलं आणि केमिस्ट्री वगळता अन्य सर्व विषयांत A+ ग्रेड मिळवून आपली जिद्द दाखवून दिली. केमिस्ट्रीतली A+ ग्रेड केवळ एका मार्काने हुकल्याचं तिला दुःख आहे. पुढे कोण होणार असं विचारलं असता, ती म्हणते, 'हॉस्पिटल्समध्ये मी बराच काळ घालवला. त्यामुळे तिथले डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली आहे. म्हणूनच इतरांना मदत करता यावी म्हणून मी वैद्यकीय क्षेत्रात जाणार आहे.' ज्याच्या हृदयामुळे ती हे यश प्राप्त करू शकली, त्याच्या कुटुंबीयांची रिझल्टनंतर तातडीने भेट घेणं तिला अगत्याचं वाटलं. विष्णूचे वडील सुनील, आई बीना आणि बहीण लक्ष्मी या तिघांनीही तिचं स्वागत करून अभिनंदन केलं आणि पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छाही दिल्या. एक प्रकारे त्यांच्या काळजाचाच तो तुकडा होता ना!
    First published:

    Tags: HSC, Kerala

    पुढील बातम्या