नवी दिल्ली, 02 मे : बुधवारी 1 मे रोजी गडचिरोलीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभुमिवर गुप्तचर विभागाकडून उत्तर प्रदेशमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील चांदौली, मिर्झापूर आणि सोनभाद्र भागात माओवादी आयईडीचा स्फोट घडवू शकतात अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांना प्रत्येक शहरात सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आयईडी हल्ला होणार असल्याची माहिती गुप्तरच यंत्रणेनं उत्तर प्रदेश सरकारला दिली आहे. त्यासाठी शहरांमध्यो मोठा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वाहनांची तपासणी, त्याचबरोबर कोणताही वाईट प्रकार होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गडचिरोलीत झालेल्या हल्ल्यामध्ये शहीदांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत
माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या 15 जवानांना मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीत आदरांजली वाहिली. ख्यमंत्री घटनास्थळी म्हणजे कुरखेड्यालाही भेट देणार आहेत. महाराष्ट्रदिनी माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १५ पोलीस शहीद झालेत. पोलिसांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोटानं हल्ला केला. माओवाद्यांच्या हल्ल्यात शहिदांच्या कुटुबीयांना 25 लाखांची मदत जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहीदांच्या कुटुंबातील एकाला नोकरी, शाहिदाच्या नोकरीचा कालावधी पर्यंत कुटुंबाला पगार, निवृत्त होईपर्यंत च्या कालावधीत सरकारी घर अशीही मदत दिली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : पुण्यात सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या..झाडल्या 13 गोळ्या, कोयत्यानेही केले वार
नेमकं काय घडलं होतं?
माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 15 जवान शहीद झाले होते. गडचिरोलीत माओवाद्यांनी हल्ला केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. माओवाद्यांनी 25 एप्रिल पुर्वीपासून या हल्ल्याची तयारी सुरू केली होती. तर जवानांवर हल्ला करून, जवानांच्या मृत्यूची खात्री केल्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले.
जवळपास दिडशेपेक्षा जास्त नक्षलवादी इथे लपून बसले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. सी 60 जवानांवर हल्ला करताना या परिसरात 150 पेक्षा जास्त नक्षलवादी होते. स्फोट होताच जवानांच्या मृत्यूची खात्री करून नक्षली पसार झाले.
छत्तीसगड आणि गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचे चार-पाच दल एकत्र येऊन एक कंपनी तयार करण्यात आली. जवानांना सापळ्यात अडकवण्यासाठी दानापुर येथे वाहनांची जाळपोळ केली. शीघ्र कृती दलाचे जवान खासगी वाहनातून निघाले असता, त्याची प्रत्येक माहिती खबऱ्यांमार्फत माओवाद्यांपर्यंत पोहोचत होती.
माओवाद्यांच्या स्थानिक दलाने हल्ल्याचा कट रचला आणि इतर दलाची मदत घेतली. हल्ला केल्यानंतर लगेच नक्षलवादी दंडकारण्यात पळून गेले. दंडकारण्य हे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंड या तीन राज्यांच्या मधे असलेलं घनदाट जंगल आहे आणि इथे केवळ माओवादीच जातात.
गडचिरोली हल्ल्याची धक्कादायक माहिती समोर, घटनास्थळावरचा पहिला VIDEO
c