#ExitPolls भाजपचा लोकसभेचा खेळ बिघडणार का?

#ExitPolls भाजपचा लोकसभेचा खेळ बिघडणार का?

तीन महत्वाच्या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 65 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत यातल्या तब्बल 60 जागा भाजपने पटकावल्या होत्या.

  • Share this:

मुंबई 7 डिसेंबर : सर्व देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभांचे एक्झिट पोल भाजपची चिंता वाढवणारे आहे. छत्तीसगड वगळता मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला दणका बसण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त होतंय.

तर मध्यप्रदेशा भाजप आणि काँग्रेसची स्थिती बरोबरीची आहे. तेलंगणात टीआरएसच बाजी मारणार हे स्पष्ट आहे. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश हे भाजपचे बालकिल्ले आहेत. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे.

त्यामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर काँग्रेसला गमाण्यासारखं काहीच नाही. या तीन महत्वाच्या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 65 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत यातल्या तब्बल 60 जागा भाजपने आपल्या झोळीत टाकल्या होत्या. तर काँग्रेसला फक्त 5 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला नाकारलं तर लोकसभेत काय होणार याची धास्ती भाजपने घेतलीय. 2014 मध्ये राजस्थानच्या एकूण 25 जागांपैकी भाजपने तब्बल 24, मध्यप्रदेशात 29 पैकी 26 तर छत्तीसगडमध्ये 11 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. यातल्या भाजपच्या अर्ध्या म्हणजे 30 जागा जरी कमी झाल्या तरी ती भरपाई कुठून करायची याचं गणित भाजपचे अध्यक्ष अमित शहांना करावं लागणार आहे.

तीन राज्यांमधली लोकसभा 2014ची स्थिती

मध्यप्रदेश 2014

एकूण जागा 29

भाजप 26

काँग्रेस 03

राजस्थान 2014

एकूण जागा 25

भाजप 24

काँग्रेस 01

छत्तीसगड 2014

एकूण जागा 11

भाजप 10

काँग्रेस 01


 


 

VIDEO : ...म्हणून सोशल मीडियावर शेअर होतायत स्लीव्हलेस फोटो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 07:17 PM IST

ताज्या बातम्या