देशातून पळून जाणाऱ्यांवर कारवाई कधी ?, सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारलं

देशातून पळून जाणाऱ्यांवर कारवाई कधी ?, सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारलं

कर्जबुडव्या विजय मल्ल्या आणि माजी आयपीएल आयुक्त ललित मोदीच्या ब्रिटनमधून प्रत्यार्पणाला होत असलेल्या विलंबाबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय.

  • Share this:

12 डिसेंबर : कुणी देश सोडून पळू गेलाय, पण तरीही सरकार काहीच का करत नाहीये. आम्ही 8 महिन्यात अनेक वेळा आदेश दिले पण कुणीचा काही करत नाही अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने विजय मल्ल्या आणि ललित मोदी प्रकरणावर केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहे. तसंच यापुढे काही निर्णय घेतले नाहीतर मंत्रालयाच्या सचिवांना समन्स बजावण्यात येईल असा इशाराही सुप्रीम कोर्टाने दिले.

कर्जबुडव्या विजय मल्ल्या आणि माजी आयपीएल आयुक्त ललित मोदीच्या ब्रिटनमधून प्रत्यार्पणाला होत असलेल्या विलंबाबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय.  "तुमची अशी भूमिका का आहे?, तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचीही परवा नाहीये. आम्ही परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही इशारा दिला, पण तरीही फरक पडला नाही"

अशा शब्दात जस्टिस अरुण मिश्रांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने फटकारलं.

तसंच कुणी पळून गेलंय, पण सरकार यावर कोणतीही कारवाई करत नाही. गेल्या आठ महिन्यात या प्रकरणी आम्ही अनेक आदेश दिले. पण तुम्ही काहीही केलं नाही असं सवालही कोर्टाने पराराष्ट्र मंत्रालयाचे वकील अतिरिक्त महाधिवक्ता मनिंदर सिंह आणि वरिष्ठ वकिल वी मोहन्ना यांना विचारलाय.

कोर्टाच्या आदेशानंतरही विजय मल्ल्या आणि ललित मोदीच्या प्रत्यार्पणात इतका उशीर का होतोय ?, कोर्टाच्या आदेशाला गांभीर्याने का घेतलं जात नाही ? असा सवालही कोर्टाने सरकारने वकिलांना केलाय.

जर सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळले नाहीतर आम्हाला मंत्रालयाच्या सचिवांना समन्स बजवावा लागेल असा इशाराही कोर्टाने दिला.  कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 डिसेंबरला ठेवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2017 06:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading