Home /News /national /

कोरोनाला हरवल्यानंतर गृहमंत्री अमित शहा लागले कामाला; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले सामील

कोरोनाला हरवल्यानंतर गृहमंत्री अमित शहा लागले कामाला; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले सामील

साधारण महिनाभरानंतर अमित शहा कामात रुजू झाले आहेत. सोमवारीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

    नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून  मंगळवारी ते कॅबिनेटच्या बैठकीत सहभागी झाले. अमित शहा यांनी कॅबिनेट बैठकीतील छायाचित्रं नागरिकांसोबत शेअर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कॅबिनेट बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. ज्यामध्ये दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अमित शहा यांनी ट्विट केलं आहे की, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झालो. यादरम्यान माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सोमवारी शाहांना एम्स रुग्णालयतून डिस्चार्ज मिळाला आहे. अमित शहा यांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना थोडा ताप होता, त्यात त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. हे वाचा-चीन म्हणतंय, आम्ही कोणत्याही देशाच्या सीमेत प्रवेश केला नाही 2 ऑगस्ट रोजी अमित शहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वांनी त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना केली होती. त्यानंतर 12 दिवसांनी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amit Shah, BJP

    पुढील बातम्या