मराठी बातम्या /बातम्या /देश /

पत्नीचा झाला मृत्यू अन् तासाभरातच पतीनंही सोडला जीव, एकाच चिथेवर दिला दोघांना मुखाग्नी

पत्नीचा झाला मृत्यू अन् तासाभरातच पतीनंही सोडला जीव, एकाच चिथेवर दिला दोघांना मुखाग्नी

(File Photo)

(File Photo)

Emotional Story: कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, विरह सहन न झाल्यानं अवघ्या एक तासात तिच्या पतीनंही आपला प्राण सोडला आहे.

  • Published by:  News18 Desk

ग्यारसपूर, 19 मे: कोरोना विषाणूच्या (Corona) दुसऱ्या लाटेनं देशात थैमान घातलं आहे. दररोज 4 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होतं आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत घातक ठरत असून एकाच कुटुंबातील एकाहून अधिक सदस्यांचा मृत्यू होण्याच प्रमाण देखील वाढलं आहे. अशा या नकारात्मक वातावरणात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, पत्नीच्या विरहामुळे अवघ्या एक तासात तिच्या पतीनंही आपला प्राण सोडला आहे. अवघ्या काही तासांच्या अंतरानं दोघा पती पत्नीचं निधन झाल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संबंधित घटना मध्यप्रदेशातील ग्यारसपूर येथील मनोरा या गावातील आहे. येथील एका 95 वर्षीय महिलेचा दीर्घ आजारामुळे मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्या धक्का सहन न झाल्यानं एक तासांतच पतीनंही प्राण सोडला आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी 100 वर्षीय प्रताप सिंह आणि त्यांच्या 95 वर्षीय धर्मपत्नी यांच्यातील अतूट प्रेमाचं नातं पाहून नातेवाईकांनी त्यांच्या चिथेला एकत्र मुखाग्नी दिला आहे. घरातील दोन्ही वयोवृद्धांचा एकाचं दिवशी मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

SBI सह भारतीय बँका विकू शकणार विजय मल्ल्याची मालमत्ता, ब्रिटिश कोर्टाची परवानगी

याबाबत प्रताप सिंह अहिरवार यांचा मुलगा अमरसिंह यानं आज तकला सांगितलं की, त्यांची 95 वर्षांची आई प्रसादीबाई अहिरवार आणि त्यांचे वडील प्रताप सिंह नेहमी एकत्र असायचे. त्याच्या वडिलांची दोन विवाह झाले होते. ही त्याची पहिली पत्नी होती, तर दुसरी अद्याप पत्नी जिवंत आहे. संबंधित वयोवृद्धांची मागील काही दिवसांपासून प्रकृती खराब होती. दरम्यान आईचं अचानक निधन झालं. सर्व नातेवाईक घरी आले होते, अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. पत्नीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाचं 1 तासानंतर वडिलांचंही अचानक निधन झालं.

हे ही वाचा-Aurangabad : वडील गमावल्याचं डोंगराएवढं दु:ख, तरी दुसऱ्याच दिवशी रुग्णसेवेत हजर

या घटनेनंतर अहिरवार कुटुंबीयांवर दुहेरी आघात झाला. पण मृत दांम्पत्याचा नात्यातील प्रेम पाहून नातेवाईकांनी दोघांच्या मृतदेहाला एकाच चिथेवर मुखाग्नी दिला. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Death, Madhya pradesh