Home /News /national /

केरळमध्ये निपाह व्हायरसची दहशत, मुलाच्या मृत्यूनंतर आता आणखी दोघांना लक्षणं

केरळमध्ये निपाह व्हायरसची दहशत, मुलाच्या मृत्यूनंतर आता आणखी दोघांना लक्षणं

केरळमध्ये (Keral) कोरोना व्हायरससोबत (Corona Virus) आता निपाह (Nipah) व्हायरसनेही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

    तिरुवनंतरपुरम, 5 सप्टेंबर : केरळमध्ये (Keral) कोरोना व्हायरससोबत (Corona Virus) आता निपाह (Nipah) व्हायरसनेही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. केरळमध्ये एका मुलाचा निपाहमुळे मृत्यू (Death) झाल्यानंतर आता आणखी दोघांना निपाहची लक्षणे दिसायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या मुलाच्या संपर्कात आलेल्या एकूण 20 जणांपैकीच हे दोघे आहेत. या दोघांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशळेत पाठवण्यात आले आहेत. मुलाच्या घराच्या परिसरात लॉकडाऊन निपाहमुळे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाच्या घराच्या परिसरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. या मुलाच्या किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या 188 जणांची यादी सध्या तयार करण्यात आली आहे. त्यातील सर्वाधिक धोका असणाऱ्या 20 जणांची चाचणी करण्यात आली आहे. यातील दोघे हाय रिस्क कॅटेगिरीत असल्याची माहिती आहे. मुलाच्या घरापासून तीन किलोमीटर परिसरात कडक लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लक्षणं दिसत असलेल्या दोन्ही व्यक्ती ह्या आरोग्य कर्मचारी आहेत. त्यातील एक खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे, तर दुसरा कोझिकोड मेडिकल कॉलेजचा कर्मचारी आहे. मेडिकल कॉलेजमध्ये तयार केला निपाह वॉर्ड निपाहची लक्षणे दिसणाऱ्या सर्वांना कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये सध्या ठेवण्यात आलं आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या संपर्कात आलेल्या 20 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. निपाहमुळे सकाळीच एका मुलाचा मृत्यू झाला. त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. या अहवालातून मुलाला निपाहची लागण झाली होती, हे स्पष्ट झाले आहे. हे वाचा - अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या पोलिसाला बेदम चोप, पाहा VIDEO या मुलाला सुरुवातीला कोरोना झाला होता. पाच दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान कोरोनाशिवाय आणखी काही गंभीर व्हायरसची लागण झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. सर्व लक्षणं निपाह व्हायरसची दिसत असल्यामुळे तातडीनं तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. आतापर्यंत केरळमध्ये 23 जणांना निपाहची लागण झाली असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Kerala, Virus

    पुढील बातम्या