पुलवामा शहिदांचे कुटुंबीय आता निशाण्यावर, दीड लाखांच्या फसवणुकीनंतर CRPFकडून अलर्ट जारी

पुलवामा शहिदांचे कुटुंबीय आता निशाण्यावर, दीड लाखांच्या फसवणुकीनंतर CRPFकडून अलर्ट जारी

पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. घरातील एक सदस्य गमावल्याच्या दुःखानंतरही शहीद जवानांच्या कुटुंबीयांसमोरील अडचणी कमी झालेल्या नाहीत.

  • Share this:

श्रीनगर, 5 मे : पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. घरातील एक सदस्य गमावल्याच्या दुःखानंतरही शहीद जवानांच्या कुटुंबीयांसमोरील अडचणी कमी झालेल्या नाहीत. कारण आता बामट्यांच्या निशाण्यावर शहीद जवानांचे कुटुंबीय आहेत. 2 मे रोजी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले कुलविंदर सिंह यांच्या आई-वडिलांना तब्बल दीड लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. यानंतर सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या आमिषाला न भुलण्याचं आवाहन सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना केलं आहे.

वाचा : भर रस्त्यात तरुण आणि महिलेची धुलाई, VIDEO व्हायरल

कुलविंदर यांच्या कुटुंबीयांची फसवणूक

कुलविंदर यांचे आई-वडील दर्शन सिंह आणि अमरजीत कौर यांनी सांगितलं की, 'फसवणूक करणारा व्यक्ती सीआरपीएफ जवानांचा गणवेश परिधान करून आला होता. हा भामटा 2 मे रोजी कुलविंदर यांच्या घरी पोहोचला. यावेळेस त्यानं सांगितलं, सरकार आमच्या खात्यात 29 लाख रुपये ट्रान्सफर करू इच्छित आहे'. यानंतर कुलविंदर यांच्या आईवडिलांनी बँक खात्याचा तपशील त्या भामट्याला दिला.

वाचा :VIDEO: पार्किंगच्या कारणावरून महिलांची तुंबळ हाणामारी

त्यानं नुकसान भरपाईची रक्कम म्हणून 50 लाख रुपये अन्य कोणाच्या तरी खात्यात ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. पण मोठ्या रक्कमेचा व्यवहार करण्यास बँकांचे काही नियम असल्यानं हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. पण तरीही भामट्यानं आपल्या खात्यात तब्बल दीड लाख रुपये ट्रान्सफर केले.

या घटनेनंतर अन्य कोणत्याही परिवाराची फसवणूक होऊ नये, यासाठी सीआरपीएफकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. आपल्या बँक खात्यांची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये, अशी सावधानता बाळगण्यास सांगण्यात आले आहे.

VIDEO: 'त्या' बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं

First published: May 5, 2019, 2:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading