मराठी बातम्या /बातम्या /देश /

COVID-19 Vaccination: लस घेतल्यानंतरही सावध राहा; वैज्ञानिकांनी दिला इशारा

COVID-19 Vaccination: लस घेतल्यानंतरही सावध राहा; वैज्ञानिकांनी दिला इशारा

कोरोना लस घेतल्यानंतरही अनेक प्रकारच्या बचावाची गरज आहे. त्यानंतरच कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकता येणार आहे.

कोरोना लस घेतल्यानंतरही अनेक प्रकारच्या बचावाची गरज आहे. त्यानंतरच कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकता येणार आहे.

कोरोना लस घेतल्यानंतरही अनेक प्रकारच्या बचावाची गरज आहे. त्यानंतरच कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकता येणार आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 16 जानेवारी : देशभरात आज जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण (Coronavirus vaccination) अभियानची सुरुवात झाली आहे. आज सुरु झालेल्या अभियानासह भारत, अमेरिका आणि ब्रिटनसह त्या देशांच्या श्रेणीमध्ये सामिल झाला आहे, जिथे कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज देशात पहिल्या टप्प्यातील कोविड-19 लसीकरण अभियानाची सुरुवात केली आहे.

संपूर्ण देशात लसीकरण सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण 3006 लसीकरण केंद्र बनवण्यात आले आहेत. कोरोना लस घेतल्यानंतरही अनेक प्रकारच्या बचावाची गरज आहे. त्यानंतरच कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकता येणार आहे.

(वाचा - Coronavirus Vaccination Drive: पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे)

विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक व्यक्तीला लशीचा डोस घेणं आवश्यक आहे, त्यानंतरच कोरोना लसीचा परिणाम दिसेल. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर, दोन आठवड्यांनी कोरोनाविरोधात अँटीबॉडी विकसित होतील. तसंच, कोरोना लसीकरणानंतरही कोविड नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे.

(वाचा - कोरोनाची लस सर्वात आधी कुणाला दिली जाणार? पंतप्रधान मोदी म्हणाले...)

विशेषज्ञांनी सांगितलं की, कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्सचं पालन करावं लागेल. कोरोना गाईडलाईननुसार, मास्क घालणं, सहा फूटांचं सुरक्षित शारीरिक अंतर राखणं आणि सतत हात धुणं अनिवार्य आहे. वॅक्सिनेशननंतर या नियमांचं पालन केलं, तरच कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो.

दरम्यान, लसीकरणासंबंधी माहितीसाठी एक कॉल सेंटर 1075 ही तयार करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात देशातील सरकारी आणि प्रायव्हेट रुग्णालयातील तीन कोटी हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सला लस दिली जाईल आणि ही पूर्णपणे मोफत असेल. याचा खर्च केंद्र सरकार करणार आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus