मराठी बातम्या /बातम्या /देश /COVID-19 Vaccination: देशात आतापर्यंत 447 लोकांमध्ये आढळले वॅक्सिनचे साईड इफेक्ट

COVID-19 Vaccination: देशात आतापर्यंत 447 लोकांमध्ये आढळले वॅक्सिनचे साईड इफेक्ट

16 जानेवारीपासून सुरू झालेल्या या अभियानादरम्यान आता काहीशी चिंताजनक माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना वॅक्सिन (Corona Vaccine) घेतल्यानंतर आतापर्यंत एकूण 447 लोकांवर प्रतिकूल परिणाम पाहायला मिळाला आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 18 जानेवारी : कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी देशात लसीकरण अभियानाची (Vaccine Campaign) सुरुवात झाली आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी कोरोना वॉरियर्सला (Corona Warriors) सर्वात आधी लस देण्यात येत आहे. 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या या अभियानादरम्यान आता काहीशी चिंताजनक माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना वॅक्सिन (Corona Vaccine) घेतल्यानंतर आतापर्यंत एकूण 447 लोकांवर प्रतिकूल परिणाम पाहायला मिळाला आहे. यापैकी तीन लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कोरोना वॅक्सिन घेतल्यानंतर, काहींना वॅक्सिनचा प्रतिकूल परिणाम दिसला आहे. दिल्लीतील 52 हेल्थ वर्कर्सला लस दिल्यानंतर समस्यांचा सामना करावा लागला आहे. वॅक्सिन घेतल्यानंतर काही लोकांना ऍलर्जीची समस्या आली आहे. तर काहींना घाबरल्यासारखं होत असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील 52 हेल्थ वर्कर्सना वॅक्सिन घेतल्यानंतर समस्या आल्या, त्यापैकी एकाला AEFI सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत एकूण 2,24,301 लोकांना वॅक्सिन देण्यात आलं आहे.

(वाचा - Corona Vaccination: लशीच्या एका डोसची किंमत ते दुष्परिणाम, वाचा सविस्तर)

दिल्लीतील आरोग्य मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारीला कोरोना वॅक्सिन दिल्यानंतर 52 हेल्थ वर्कर्समध्ये किरकोळ समस्या दिसून आल्या, तर एकात गंभीर समस्या दिसल्या. ज्या हेल्थ वर्करला एडमिट करण्यात आलं आहे, त्याचं वय 22 वर्ष असून तो सिक्योरिटीमध्ये काम करतो. त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.

(वाचा - Coronavirus Vaccination Drive: पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे)

बाकी 51 जणांना काही तासांच्या निरिक्षणानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. सरकारने प्रत्येक सेंटरवर एक AEFI सेंटर बनवले आहेत, जिथे लस दिल्यानंतर काही समस्या आल्यास, चेकअपची सुविधा मिळते.

काही लोकांना वॅक्सिनच्या किरकोळ समस्या दिसल्या असल्या तरी, ही सौम्य लक्षण असल्याने घाबरण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. लसीकरणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी लशीबाबत बोलताना सांगितलं की, आपले वैज्ञानिक आणि विशेषज्ञ ज्यावेळी दोन्ही मेड इन इंडिया वॅक्सिन सुरक्षित आणि प्रभावी असल्याबाबत आश्वस्त झाले, त्यावेळीच या वॅक्सिनला परवानगी देण्यात आली.

First published:

Tags: Corona vaccine, Corona virus in india