Home /News /national /

कोरोना पॉझिटिव्ह जावयानं लावली सर्वांची वाट, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरा-नवरीसह 100 जण क्वारंटाइन

कोरोना पॉझिटिव्ह जावयानं लावली सर्वांची वाट, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरा-नवरीसह 100 जण क्वारंटाइन

जावयाची एक चूक सगळ्यांना पडली महागात, सप्तपदी घेतल्यानंतर नवरा-नवरी थेट क्वारंटाइन

    नवी दिल्लीस 28 मे : एकीकडे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळं सर्व लोकं घरात कैद आहेत. त्यामुळं लग्न समारंभासह सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. यातच दिल्लीतील एका लग्नानं सर्वांच्या अडचणी वाढवल्या आहेत. दिल्लीतील छिंदवाडा येथील एका लग्नात वर-वधुनं सप्तपदी घेतल्यानंतर लगेचच त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं. याचं कारण ठरले कोरोना पॉझिटिव्ह भाऊजी. सीआयएसएफमध्ये (CISF) काम करत असलेले नवरीचे भाऊजी सध्या दिल्लीत होते. काही दिवसांपूर्वी ते आपल्या मेहुणीच्या लग्नात सामिल झाले होते. त्यानंतर त्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. कोरोनाची लक्षणं असतानाही ते लग्न समारंभास पोहचले आणि लग्न पार पडल्यानंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेण्यात आला. त्यामुळं त्यांच्या संपर्कात आलेल्या नवविवाहित जोडप्यालाही 14 दिवस क्वारंटाइन करण्यात आलं. एवढंच नाही तर लग्नास उपस्थित असलेल्या 100 लोकांनाही होम क्वारंटाइन सांगितलं आहे. वाचा-कोरोनाची प्रकरणं कितीही वाढली तरी मृत्यूच्या आकड्यावर नियंत्रण शक्य छिंदवाडा-होशंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर आरोग्य तपासणी करण्यात आली छिंदवाडा जिल्हाधिकारी सौरभ सुमन यांनी सांगितले की सीआयएसएफमध्ये तैनात असलेला हा सैनिक 20-21 मे दरम्यान दिल्लीत आला होता. त्यांची आरोग्य तपासणी छिंदवाडा-होशंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर करण्यात आली. आरोग्याची तपासणी पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्या मूळ गाव छिंदवाडा येथील जुन्नारदेव इथं गेले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी त्याने पारसिया प्रदेशात राहणाऱ्या काही नातेवाईकांशीही भेट घेतली होती. सीआयएसएफ जवानांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वाचा-Lockdown 5.0 ची तयारी की EXIT plan? प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुरू
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या