मराठी बातम्या /बातम्या /देश /

सरकारचे Twitter अकाउंट हॅक, तीन दिवसांत चौथं सरकारी अकाऊंट टार्गेटवर;15 मिनिटांत 500 हून अधिक Tweet

सरकारचे Twitter अकाउंट हॅक, तीन दिवसांत चौथं सरकारी अकाऊंट टार्गेटवर;15 मिनिटांत 500 हून अधिक Tweet

मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक झाल्याच्या 48 तासांनंतर यूपी सरकारचे ट्विटर हँडल हॅक झालं आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक झाल्याच्या 48 तासांनंतर यूपी सरकारचे ट्विटर हँडल हॅक झालं आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक झाल्याच्या 48 तासांनंतर यूपी सरकारचे ट्विटर हँडल हॅक झालं आहे.

    लखनऊ, 11 एप्रिल: इंटरनेट मीडियावर सरकारी कामाचा वाढता कल पाहता धोकाही तितकाच वाढला आहे. त्यासंदर्भातल्या हॅकिंगच्या घटनाही वाढत आहेत. उत्तर प्रदेशच्या सीएम ऑफिसचे ट्विटर हँडल हॅक केल्यानंतर 48 तासांनंतर हॅकर्सनी (Hackers) उत्तर प्रदेश सरकारचे (Uttar Pradesh government) ट्विटर हँडल हॅक (Twitter handle) केलंय. आता सरकार आणि प्रशासनात घबराट निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक झाल्याच्या 48 तासांनंतर यूपी सरकारचे ट्विटर हँडल हॅक झालं आहे. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास उत्तर प्रदेश सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल हॅकर्सनं ताब्यात घेतल्याने उत्तर प्रदेश प्रशासनात घबराट पसरली. @UPGovt ट्विटर हँडल हॅकरने हॅक केलं. हॅक केल्यानंतर हॅकर्सनी यूपी सरकारचे ट्विटर हँडल बदललं तसेच हजारो ट्विटही केलं. हॅकरनं अनेक ट्विटही केले आहेत. सायबर एक्सपर्टच्या टीमने अकाऊंट रिकव्हर केलं आहे. सायबर एक्सपर्टची टीम हॅकरनी केलेलं ट्विट काढून टाकत आहेत. या प्रकरणीही पोलीस एफआयआर नोंदवणार असल्याचं समजतंय. आतापर्यंत पोलिसांना हॅकरची कोणतीही माहिती मिळालेली नाही. यूपी सरकारसोबतच उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती विभागाचे तथ्य तपासणी आणि काँग्रेसचे ट्विटर हँडलही हॅक करण्यात आले. सुरुवातीला हॅकर्सनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा डिपी बदलून अॅनिमेटेड फोटो लावला आणि (Official Twitter Handle Of Chief Minister Office, Uttar Pradesh)मुख्यमंत्री कार्यालय, उत्तर प्रदेशच्या अधिकृत ट्विटर हँडलऐवजी बायोमध्ये @BoredApeYC @YugaLabs असं लिहिलं. या घटनेनंतर सायबर एक्सपर्टची मदत घेण्यात आली, त्यानंतर अकाऊंट पुन्हा सुरक्षित करण्यात आलं. हॅकर्सनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 50 हजारांहून अधिक ट्विट केले होते. जे नंतर हटवण्यात आले. त्याचवेळी, संपूर्ण घटनेबाबत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, मुख्यमंत्री कार्यालय @CMOfficeUP चे अधिकृत ट्विटर अकाउंट 09 एप्रिल, 12:30 वाजता विरोधी पक्षाकडून हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सामाजिक घटक, काही ट्विट पोस्ट केले. जे लगेच रिकव्हर करण्यात आले. या प्रकरणाची सायबर तज्ज्ञांकडून चौकशी केल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल. पती राहायचा वेगळा, पत्नी उचलत होती टोकाचं पाऊल; पण वेळेत पोहोचले पोलीस अन्... हॅकरने सुमारे 15 मिनिटांत 500 हून अधिक ट्विट केले होते. तसेच सुमारे 5 हजार लोकांना टॅग केलं होतं. हॅक झालेल्या ट्विटर हँडलचे स्क्रीनशॉट्स अनेक वेबसाइट्सनी फ्लॅश केले होते. यावरून हॅकर्सनी अकाऊंटमधील प्रोफाइल पिक्चरच्या जागी कार्टून टाकल्याचं उघड झाले. यापूर्वी हे अकाऊंट हॅक यापूर्वी, यूपीचे मुख्यमंत्री कार्यालय, हवामान विभाग आणि यूजीसीचे अधिकृत ट्विटर हँडल हॅक झाले होते. या सर्व हॅक झालेल्या अकाऊंटवरून ब्लॉक चेनचा प्रचार करण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून देशातील नामांकित संस्था हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. शनिवारी हवामान खात्याचे ट्विटर हँडल दोन तासांहून अधिक काळ हॅकर्सनी हॅक केले होते. अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकर्सनी आधी अकाउंटचा प्रोफाईल फोटो बदलला पण नंतर तो फोटो काढून टाकण्यात आला. त्याचवेळी हवामान खात्याचे अकाऊंट रिकव्हर करण्यासाठी तब्बल दोन तास लागले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Twitter account, Uttar pradesh news, Yogi Aadityanath

    पुढील बातम्या