Home /News /national /

Telegram Channel blocked: 'बुली बाई अ‍ॅप' नंतर टेलिग्राम चॅनेल वादाच्या भोवऱ्यात, धक्कादायक कारण आले समोर

Telegram Channel blocked: 'बुली बाई अ‍ॅप' नंतर टेलिग्राम चॅनेल वादाच्या भोवऱ्यात, धक्कादायक कारण आले समोर

Telegram Channel blocked

Telegram Channel blocked

सरकारने टेलिग्राम चॅनल ब्लॉक (Telegram Channel blocked) केले आहे. या चॅनेलवर हिंदू महिलांना लक्ष्य केले जात होते. ज्यामध्ये हिंदू महिलांचे फोटो अश्लिल फोटो शेअर करण्यात आले होते.

    नवी दिल्ली, 5 जानेवारी: 'बुली बाई अ‍ॅप' हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका अॅपच्या चॅनेलसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारने टेलिग्राम चॅनल ब्लॉक (Telegram Channel blocked) केले आहे. या चॅनेलवर हिंदू महिलांना लक्ष्य केले जात होते. ज्यामध्ये हिंदू महिलांचे फोटो अश्लिल फोटो शेअर करण्यात आले होते. या प्रकरणी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या 'बुली बाई अ‍ॅप' या वादग्रस्त प्रकरणांमध्ये मास्टरमाईंड असलेली उत्तराखंडची केवळ 18 वर्षीय तरुणी श्वेता हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असतानाच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. टेलिग्राम हे चॅनेल गेल्या वर्षी जूनमध्ये तयार करण्यात आला होते. या ग्रुपमधील सदस्यांनी हिंदू महिलांना टार्गेट केल्याचा आरोप, ट्विटरवरील एका तक्रारीतून करण्यात आला होता. Bulli Bai App Case: 18 वर्षीय तरुणी निघाली मास्टरमाईंड, कोण आहे ही मुलगी अन् प्रकरण आहे तरी काय?  वादग्रस्त चॅनेलवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे ट्विट एका महिलेने आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत केले होते. या महिलेच्या ट्विटला आयटी मंत्री वैष्णव यांनी उत्तर दिले. संबंधित वादग्रस्त चॅनलवर बंदी घालण्यात आली आहे आणि पुढील कारवाईसाठी केंद्र सरकार राज्य पोलिस अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे, असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. 'बुल्ली बाई' अॅप प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी उत्तराखंडमधून आणखी एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. मयंक रावल (21) नावाच्या विद्यार्थ्याला बुधवारी पहाटे उत्तराखंडमधून अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने याप्रकरणी मुख्य आरोपी श्वेता सिंग (19) यांना उत्तराखंडमधून आणि विद्यार्थी विशाल कुमार झा (21) याला बेंगळुरूमधून अटक केली होती.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Cyber crime

    पुढील बातम्या